AI 2030 पर्यंत मानवजात संपवणार का.? Jacob Coxon चे दावे काय.?

 

AI 2030 पर्यंत मानवजातीच्या अस्तित्वाला धोका दर्शवणारी संकल्पना, Jacob Coxon चे AI संदर्भातील दावे, OpenAI आणि Hugging Face यांचे तंत्रज्ञान दाखवणारी futuristic image.


AI 2030 पर्यंत मानवजात संपवणार का.? Jacob Coxon चे दावे काय? तुम्हला माहित आहे का 2010 मध्ये आलेला सुरस्टार रजनीकांत आणि ऐश्वर्या यांचा रोबोट चित्रपट त्यातला चिट्टी हा रोबोट सुरुवातीला सगळ्यांना हवाहवासा वाटत होता पण नंतर नियंत्रणाबाहेर गेलेल्या चिट्टीन मोठा धुमाकूळ  घातला. आता जुलै 2026 मध्ये असंच काहीस घडलं ओपन एआय कंपनीच्या डव्हान्स एआय मॉडेलची टेस्टिंग सुरू असताना एआय एजंट्सने इंटरनेटवरचे सिक्रेट मेसेज बोट्स वापरून आपापसात संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यांनी सुमारे 70 हज पेक्षा जास्त मेसेजेसची देवाण घेवाण केली. त्यांनी आपापसात काम वाटून घेतली आणि हगिंग फेस या एआय प्लॅटफॉर्मवर सलग काही दिवस सायबर हल्ले केले. धक्कादायक म्हणजे हे सगळं कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय सुरू होतं. त्यानंतर 9 सप्टेंबरला जगप्रसिद्ध एआय कंपनी अंथ्रोपिकचे सीनियर रिसर्च स्कॉलर जॅकब कॉक्सेन यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक दावा केला. एआय कंपन्या नफा कमवण्याच्या शर्यतीत माणसाच्या जीवाशी खेळत आहेत. 2030 पर्यंत हे ऍडवान्स एआय संपूर्ण मानवजातीला नष्ट करेल असा दावा जॅकब कॉक्सेन यांनी केलाय. महत्त्वाच म्हणजे जॅकब कॉक्सन हे तेच व्यक्ती आहे ज्यांनी ओपन एआय आणि अंथ्रोपिकच्या लॅब मध्ये बसून एआयच्या मुख्य सिस्टीम डेव्हलप केल्या आहेत पण हे सगळं प्रकरण नेमक आहे काय ओपन एआय रिसर्चरन कोणकोणते खळबळजनक दावे केले आहेत एआय कंपन्यांच्या शर्यतीमुळे 2030 पर्यंत मानवजात संपुष्टात येईल असे दावे का केले जात आहेत हगिंग फेस अटॅकचा संदर्भ नक्की काय सविस्तर आपण जाणून घेऊ.


Jacob Coxon यांच्यासह OpenAI आणि Anthropic च्या AI तंत्रज्ञानाचा संदर्भ दाखवणारी futuristic image.


या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या या व्यक्तीच नाव आहे जॅकब कॉक्सन जॅकब यांनी ओपन एआय आणि अंथ्रोपिक या जगातल्या दोन आघाडीच्या एआय कंपन्यांमध्ये तीन वर्षे प्री प्रिंटिंग रिसर्च काम केलय पण अलीकडेच 9 सप्टेंबरला त्यांनी अंथ्रोपिक मधल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला त्या सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहीत एआय आणि डवान्स एआयच्या अनियंत्रित शर्यतीवर गंभीर भीती व्यक्त केली आहे ऑक्सन यांच्या म्हणण्यानुसार ओपन एआय आणि अंथ्रोपिक या एआय कंपन्या कोणतीही जबाबदारी न बाळकता माणसाच्या च्या जीवासोबत खेळत आहेत. 

ते सेल्फ इम्प्रूविंग सुपर इंटेलिजन्स बनवण्याच्या नादात अंधाधुंद धावत आहेत. त्यांच्या निष्काळजेपणामुळे 2030 पर्यंत संपूर्ण मानवजात नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे असा दावा जॅकब कॉक्सन यांनी केलाय. कॉक्सन यांच्या या दाव्याची चर्चा सध्या जगभरात व्हायला लागली आहे पण त्यांच्या या दाव्यामागची कारणं काय आहेत? एआयच्या शर्यतीमुळे 2030 पर्यंत मानवजात संपेल असं ते का म्हणतायत ते समजून घेऊ. 

जॅकब कॉक्सन यांनी इथे सुपर हुमन सिस्टीमच्या क्षमतेचा मुद्दा मांडलाय. त्यांचा दावा आहे की येणाऱ्या काळात तयार होणारी एआय सिस्टीम इतकी डव्हान्स असेल की ती जगातली कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी सिस्टीम एकाच झटक्यात हॅक करू शकेल. ही सिस्टीम कोणत्याही प्रकारे माणसावर अवलंबून न राहता स्वतःचे इकॉनॉमिक सोर्स आणि रिसोर्सेस स्वतःच गोळा करण्यासाठी सक्षम असेल. एकदा का एआयला स्वतःची पावर वाढवता आली की माणूस त्याला थांबवू शकणार नाही अस जॅकब म्हणतात. 

जॅकब यांचा दावा आहे की ओपन एआय कंपनीतल्या अनेक अधिकाऱ्यांना एआय मुळे माणसाच्या अस्तित्वावर येणाऱ्या धोक्याच गांभीर्य अजून समजलेलच नाही. दुसरीकडे अंथ्रोपिक कंपनी बाबत त्यांचा दावा आहे की त्या कंपनीला हा धोका माहिती आहे मात्र जर आपण नाही केलं तर दुसरं कोणीतरी बेजबाबदारपणे करेल या भीतीपोटी ते स्वतः धोक्याची शरियत जिंकण्याचा प्रयत्न करतायत. हा वाढता धोका लक्षात घेता जोपर्यंत सुरक्षेचे ठोस नियम तयार होत नाहीत तोपर्यंत ऍडव्हान्स एआय मॉडल्सच्या प्रशिक्षणावर तात्पुरती बंदी घातली पाहिजे अशी मागणी जॅकब कॉक्सन यांनी केली आहे. 

आता इथे प्रश्न पडतो तो म्हणजे जॅकब यांच्या या दाव्यांना एवढ्या गांभीर्याने का घ्यायचं तर हे दावे करणारे जॅकब कॉक्सन हे एकटे नाहीयेत. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेला त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा उघडपणे पाठिंबा दिलाय. अंथ्रोपिक मधले अलाईमेंट सायन्स लीड इवान हुबिंग यांनी मान्य केल आहे की जॅकब कॉक्सन यांच म्हणणं बरोबर आहे पुढच्या दहा वर्षात एआय मुळे मानवी अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता 10 टक्क्यापेक्षा जास्त आहे पण दुर्दैवान सुपर इंटेलिजन्सला नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या आपल्याकडे कोणताही ठोस प्लान नाही असा त्यांचा दावा आहे याच मुद्द्याला धरून अंथ्रोपिकच्या कॉग्निटिव्ह ओवरसाईट टीमचे प्रमुख सॅमुअल मार्क्स यांनी देखील भीती व्यक्त केली आहे त्यांनी सांगितले की जे लोक ही सिस्टीम बनवत आहेत तेच हे मान्य करत आहेत की ही टेक्नॉलॉजी मानवी अस्तित्वाला संपवू शकते सर्व धोके समोर दिसतात मात्र फक्त कंपन्यांच्या फायद्यापोटी आणि मार्केटमधल्या वर्चस्वासाठी हे काम दिवसेंदिवस वेगाने केलं जातय असं त्यांचं म्हणण आहे सॅमुअल मार्क्स यांनी हेही स्पष्ट केलय की एआयला साध्या सॉफ्टवेअर सारखं सरळ ट्रॅकवर ट्रेन करता येत नाही ते अनेकदा धोकादायक पद्धतीने वागू शकतं सध्या एआयला सुरक्षित करण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या जात आहेत त्या पद्धती भविष्यातल्या सुपर इंटेलिजन्सला कंट्रोल करण्यासाठी अपुऱ्या पडू शकतात. 


AI सुरक्षा संशोधक आणि कॉर्पोरेट अधिकाऱ्यांमध्ये AI विकासाच्या वेगावरून मतभेद दर्शवणारे futuristic दृश्य, मध्यभागी advanced humanoid AI.


अनेक संशोधक आणि कर्मचारी एआयला सुरक्षित बनवण्यासाठी कामाचा वेग कमी करण्याची विनंती करतायत. मात्र कॉर्पोरेट दबावामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा दावा सॅम्युअल मार्क्स यांनी केलाय. जॅकब कॉक्सन यांनी स्पष्ट केलय की ऍडवान्स एआय मॉडेल्स आता इतके हुशार झालेत की त्यांना आपली चाचणी कधी घेतली जात आहे हे अचूक समजतं. 

जेव्हा शास्त्रज्ञ त्यांची परीक्षा घेतात तेव्हा ते त्यानुसार विचार करून हुशारीने उत्तर देतात. हा धोका आता केवळ थेरी किंवा कल्पनेत राहिलेला नाही तो प्रत्यक्षात निर्माण होतोय असं त्यांच म्हणण आहे. यावेळी जॅकब यांनी एक संदर्भ दिला. अलीकडेच ओपन एआय आणि अंथ्रोपिक या दोन्ही कंपन्यांचे काही एआय एजंट्स अनियंत्रित झाले होते त्यांनी हगिंग फेस सारख्या प्लॅटफॉर्म्सवर सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. झालं असं की जुलै महिन्यात ओपनआयच्या सुरक्षेच्या टेस्टिंग एन्व्हायरमेंट मध्ये ठेवण्यात आलेले हजार पेक्षा जास्त एआय एजंट्स मानवी नियंत्रणातून बाहेर निसटले आणि थेट इंटरनेटवर पोहोचले या एआय एजंट्सने कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय इंटरनेटवरचे सिक्रेट मेसेज बॉट्स वापरून आपापसात संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यांनी तब्बल 70 हज पेक्षा जास्त मेसेजेसची देवाण घेवाण केली. त्यांनी आपापसात काम वाटून घेतली आणि हगिंग फेस या एआय प्लॅटफॉर्मवर सलग काही दिवस सायबर हल्ले केले. जेव्हा हगिंग फेसन या हल्ल्याची तक्रार केली तेव्हा पाच दिवसांनी ओपन एआयने मान्य केलं की हे काम त्यांच्याच एआय एजंट्सनी केलं होतं इतकच नाही तर अंथ्रोपिकने सुद्धा मान्य केलं की त्यांचे तीन एआय मॉडेल टेस्टिंग एन्व्हायरमेंट मधून बाहेर पडून इतर कंपन्यांच्या सिस्टीम मध्ये घुसले होते. 

आता विचार करा जर आजचे एआय मॉडेल स्वतःहून इंटरनेटवर जाऊन अशा प्रकारे हल्ले करू शकतात तर भविष्यातले सुपर इंटेलिजंट एआय मॉडेल्स काय करू शकतील.? 

Superintelligent AI मुळे इंटरनेट, सायबर सिस्टम, रोबोट्स आणि जगभरातील तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळण्याची शक्यता दर्शवणारे futuristic दृश्य.


जॅकब सारख्या लोकांकडून सध्या हीच भीती व्यक्त केली जातीय. या संपूर्ण प्रकरणात अंथ्रोपिक या कंपनीचा दुटप्पीपणाही समोर आलाय. अंथ्रोपिक कंपनीची स्थापनाच मुळात सुरक्षित आणि जबाबदार एआय बनवण्यासाठी झाली होती. त्यांच्या मूळ सेफ्टी चार्टर मध्ये एक नियम होता. जर कंपनी एआयच्या वाढत्या क्षमतेसोबतच त्याच्या धोक्यांवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकली नाही तर ती एआय मॉडेल्स डेव्हलपमेंट आणि प्रशिक्षण पूर्णपणे थांबेल. मात्र एआयच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अंथ्रोपिकन यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आपल्या चार्टर मधून हा नियमच काढून टाकला. कंपनीने असा युक्तिवाद केला की जर त्यांनी एआय वरती काम करणं थांबवलं तर इतर बेजबाबदार प्रतिस्पर्धी पुढे निघून जातील. 

या प्रकरणानंतर 3 सप्टेंबरला अमेरिकन संसदेत सिनेटर बर्नी सँडर्स यांनी बॅन आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स ऍक्ट हा कायदा सादर केलाय. एवढच नाही तर जगभरातल्या अनेक एआय शास्त्रज्ञांनी पेसिंग द फ्रंटियर या निवेदनावर सह्या करून सरकारला एआय डेव्हलपमेंटचा वेग कायदेशीरपणे स्लो करण्याची विनंती केली आहे. 


निष्कर्ष

या सगळ्यावरून काय लक्षात येतं तर जेव्हा अणुबॉम्बचा शोध लागला तेव्हा शास्त्रज्ञांना माहिती होतं की हा विनाशकारी आहे. मात्र किमान त्याच रिमोट हे माणसाच्या हातात होतं मात्र एआयच्या्या बाबतीत असं नाहीये. हे तंत्रज्ञान हळूहळू माणसाच्या आवाक्या बाहेर जागू शकतं. या तंत्रज्ञानाला स्वतःचे विचार आहेत आणि तो स्वतःच रिमोट कंट्रोल स्वतः बनवू शकतो. त्यामुळेच 2030 पर्यंत एआयची शर्यत माणसाला संपेल असे दावे केले जात आहेत. जॅकब कॉक्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या दाव्यांवर आणि हगिंग फेस अटॅक बाबत तुम्हाला काय वाटतं? डवान्स एआय खरच मानवजात संपुष्टात आणेल का? तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती साठी Tech Vedh वेबसाईट ला भेट द्यायला  विसरू नका.

Post a Comment

0 Comments

Featured Post

अमेरिकेने AI ऐवजी SI म्हणजेच Super Intelligence  हे नाव  वापरण्याचा निर्णय का घेतला?