अमेरिकेने AI ऐवजी SI म्हणजेच Super Intelligence हे नाव वापरण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न सध्या Artificial Intelligence च्या जगात चर्चेचा विषय ठरत आहे.
23 सप्टेंबर 2026 रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याशी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलपासून सुरू झालेला हा शब्दबदल पुढे अमेरिकन सरकारच्या पातळीवर पोहोचला. वरवर पाहता हा फक्त एका शब्दाचा बदल वाटतो. मात्र AI च्या भविष्यातील क्षमता, Super Intelligence ची संकल्पना, AI Safety आणि तंत्रज्ञानावर नियंत्रण यांसारखे प्रश्न समोर ठेवले, तर या निर्णयामागची चर्चा अधिक गंभीर बनते.
या संपूर्ण प्रकरणात एकाच वेळी अनेक प्रश्न उपस्थित होतात
AI ऐवजी Super Intelligence हे नाव का निवडलं गेलं?
हे नाव ठरवण्याची प्रक्रिया काय होती?
अमेरिकेतील मोठ्या टेक कंपन्यांच्या प्रमुखांनी व्हाईट हाऊसमध्ये कोणत्या करारावर स्वाक्षरी केली?
या संपूर्ण घडामोडींचा भारतावर काही परिणाम होणार आहे का?
आपण AI ते SI या नावबदलाची संपूर्ण पार्श्वभूमी, Super Intelligence म्हणजे काय, AI Safety शी त्याचा संबंध आणि या निर्णयामागील महत्त्वाचे प्रश्न सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
अमेरिकेने AI ऐवजी SI नाव का वापरायला सुरुवात केली?
23 सप्टेंबर 2026 ला वॉशिंग्टन मधलं अमेरिकेचं परराष्ट्र खातं संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या इनबॉक्समध्ये एक ईमेल पाठवला गेला.
सब्जेक्ट लाईन होती अगदी साधी चेंज इन नोमेनक्लेचर [एआय टू एसआय ]म्हणजे आजपासून तुम्ही लिहीत असलेल्या प्रत्येक रिपोर्ट मध्ये प्रत्येक भाषणात प्रत्येक कागदावर एआय हा शब्द लिहायचा नाही त्याऐवजी एसआय असं लिहायचं म्हणजे सुपर इंटेलिजन्स सहा दिवसांनी 29 सप्टेंबरला हाच नियम डोनाल्ड ट्रंप यांच्या व्हाईट हाऊसच्या कार्यकारी आदेशातून संपूर्ण अमेरिकी सरकारला लागू झाला.
वरवर पाहता ही एक गमतीशीर बातमी वाटेल. एका नेत्याला म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना एक शब्द आवडला नाही त्यांच्या मनात आलं त्यांनी तो शब्द बदलून टाकला पण गंमत इथे संपते आणि इथं चालू होतो गेम कारण एआयच्या जगात सुपर इंटेलिजन्स हा शब्द नवीन नाही.
Super Intelligence म्हणजे काय?
शास्त्रज्ञ हा शब्द अशा गोष्टीसाठी वापरतात जी माणसापेक्षा जास्त हुशार असेल जिच्या भीतीने अमेरिकेत तिच्यावर बंदी घालणार एक विधेयक ऑलरेडी मांडल गेलय म्हणजे ज्या गोष्टीची जगाला आता सध्या सर्वात जास्त भीती वाटते नेमकं तेच नाव अमेरिकेच्या च्या प्रेसिडेंटनी आजच्या एआयला दिलंय.
मग प्रश्न पडतो की हे नाव निवडलं कुणी आणि कसं याच्यासाठी कुठली पद्धत अवलंबली गेली?
नाव बदलल्यामुळे नेमकं काय बदलतं?
ज्या दिवशी हे नाव बदललं त्याच दिवशी जगातल्या सगळ्यात मोठ्या टेक कंपन्यांच्या प्रमुखांनी व्हाईट हाऊस मध्ये जाऊन कशावर सही केली?
आणि हे सगळं आत्ताच का घडतंय?
याच महिन्यात का घडतंय?
या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधूया.
AI ते SI हा बदल संपूर्ण जगासाठी आहे का?
पण सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो कारण सोशल मीडियावर याबद्दल बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी फिरतायत ट्रम्प यांनी एआय च नाव संपूर्ण जगभरासाठी बदललेल नाही तर त्यांनी बदललय फक्त अमेरिकन सरकारसाठी आणि अमेरिकन कायद्यामध्ये ह्या गोष्टी व्हायला आणखी काही वेळ लागणार आहे.
पण सध्या मात्र अमेरिकेच्या सरकारच्या सर्व विभागांमध्ये हे कंपलसरी असणार आहे.
ईमेल
वेबसाईट
रिपोर्ट
धोरण
सगळीकडे सुपर इंटेलिजन्स असं लिहिलं जाईल.
AI चे नाव Super Intelligence कसं ठरलं?
आता पहिला प्रश्न आहे हे नाव ठरलं कसं आता ते ठरलं एका सोशल मीडियाच्या पोलवरती म्हणजे याच्यासाठी वेगळी काही मेथड अवलंबली नव्हती ट्रंप यांनी त्यांचे जे ट्रुथ सोशल नावाचा प्लॅटफॉर्म आहे.
तिथे लोकांना विचारलं की एआयला आता नवीन नाव द्यायचं असं मी ठरवलंय मग तुम्हाला काय नाव पाहिजे त्याच्यामध्ये काही पर्याय दिले त्याच्यामध्ये 66 टक्के मत पडली.
लोकांनी सांगितलं सुपेरियर इंटेलिजन्स असं नाव द्यावं त्याला सगळ्यात जास्त मत मिळालेली होती दुसऱ्या दिवशी ट्रंप यांनी पुन्हा नवीन नाव टाकलं सुपेरियर इंटेलिजन्स द्यायचं की सुपर इंटेलिजन्स द्यायचं यावेळी वेळी सुपर इंटेलिजन्सला 65 टक्के मत पडली.
सुपर इंटेलिजन्स जिंकला.
थोडा विचार करा ज्या तंत्रज्ञानावर पुढच दशक पुढच्या दशकातल्या अनेक गोष्टी कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या शिक्षण युद्ध अशा अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे.
त्यांचं सरकारी नाव एका ऑनलाईन पोल मधून ठरलं.
ट्रम्प यांचं कारण सोपं होतं ट्रम्प म्हणाले आर्टिफिशियल म्हणजे नकली खोटं आणि सुपर हा सगळ्यात चांगला आणि सगळ्यात सोपा शब्द आहे.असं त्यांचं मत आहे म्हणून त्यांनी नाव बदलायची ची ही तयारी चालू केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही नाव बदलले आहेत
डोनाल्ड ट्रंप यांनी नाव बदलायची ही काही पहिली वेळ नाही त्यांना देखील नाव बदलायला खूप आवडतात 2025 मध्ये त्यांनी गल्फ ऑफ मेक्सिकोच नाव गल्फ ऑफ अमेरिका केलं आणि गेल्याच महिन्यात कॅनडा बरोबर त्यांचा वाद झाला.
या वादानंतर त्यांनी लेक ऑनटारियो जो अमेरिका आणि कॅनडा यांच्यामध्ये आहे त्याचं नाव लेक अमेरिका असं करायचा आदेश काढला म्हणजे नाव बदलणं हे त्यांचा आवडतं काम आहे.
Super Intelligence चा AI मधील अर्थ
आता मात्र ते संपूर्ण जगावर परिणाम करेल इतपत मोठं बदलल गेले पण इथं खरी गंमत आहे सुपर इंट इंटेलिजन्स या शब्दाचा अर्थ एआयच्या जगात अगोदरच ठरलेला आहे आणि ही एक अशी बुद्धिमत्ता असणार आहे.
जी जवळपास प्रत्येक बाबतीत माणसापेक्षा वरचड असेल आणि अशी बुद्धिमत्ता अजून तरी एआय तयार करू शकलेला नाही.
आता सुपर इंटेलिजन्स म्हणजे काय असतं जो जुना अर्थ आहे तो असा असतो की जेव्हा आपण आता काय करतोय माणसं एआय तयार करतात एआयला वापरतात पण सुपर इंटेलिजन्स म्हणजे अशी अवस्था असेल जिथं एआय नवीन एआय तयार करेल अशा पद्धतीने एआयला माणसांची गरज राहणार नाही.
ज्या गोष्टीची जगाला भीती वाटते आणि हीच गोष्ट भीतीदायक आहे म्हणून एआय सुरक्षेबद्दल बोलणारे लोक याची भीती नेहमी व्यक्त करतात.
अमेरिकेत Super Intelligence वर विधेयक
अमेरिकेत जे सिनेटर आहेत बर्नी सँडर्स आणि ग्रेक कसार यांनी बॅन आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स ऍक्ट नावाच एक विधेयक तिथे सिनेटमध्ये मांडलय माणसाच्या नियंत्रणाबाहेरची सुपर इंटेलिजन्स बनवणं थांबवा अशी मागणी करणारं आणि कहर म्हणजे appपल चे सहसंस्थापक स्टीव् वजनियाकी आणि ट्रंप यांचे जुने सल्लागार असणारे स्टीव् बॅनन या दोघांनीही एका या करारावरती सह्या केलेल्या आहेत.
म्हणजे हे जे विधेयक आहे त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत या दोघांचं दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावर पटत नाही पण या मुद्द्यावर पडते सुपर इंटेलिजन्सच्या विकासावर बंदी घाला म्हणून इथे डावे आणि उजवे एकत्र आले.
AI ऐवजी SI नाव आत्ताच का बदललं?
अशी अमेरिकेच्या इतिहासात ही अनेक वर्षानंतर घडलेली पहिलीच घटना आणि अमेरिकेन हेच नाव आता एआयलाच दिले म्हणजे प्रत्येक वेळेला एआयचा उल्लेख आता एसआय म्हणून केला जाईल मग प्रश्न येतोय की हे आताच का केल गेलं तर याचं उत्तर सप्टेंबरच्या सुरुवातीला दडलय.
अंथ्रोपिकच्या एआय कंपनीचे जे संशोधक होते [जेकब कॉक्सन] यांनी राजीनामा दिलेला होता आणि जाता जाता एक्स वरती एक पोस्ट टाकलेली होती जी व्हायरल झाली ज्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आम्ही देखील केलेला होता.
ओपन एआय आणि अंथ्रोपी हे लोकांच्या जीवाशी जुगार खेळत आहेत आणि एआय बनवणाऱ्यांना खरोखरच वाटतं की दशकाच्या अखेरीपर्यंत एआय सगळ्या माणसांचा जीव घेऊ शकते असा त्यांचा तो इशारा होता त्यातच कंपनीचे म्हणजे अंथ्रोपेचे आत्ताचे जे संशोधक आहेत इवान हुबिंगर यांनी देखील आपण कॉक्सन यांच्याबरोबर सहमत आहोत.
असं जाहीर केलं अमेरिकेत यामुळे खळबळ उडाली युगाव आणि इकॉनॉमिस्टच्या सर्वेक्षणामध्ये एआय चे धोके अतिशय गंभीर वाटणाऱ्यांच प्रमाण जे अगोदर 35 टक्के होतं ते वाढून 42 टक्क्यांच्या पर्यंत गेलं अनेकांच म्हणण असं आहे की पुढे ज्या मध्यावधी मिडटम इलेक्शन्स येणार आहेत.
त्याच्या समोर लक्ष ठेवून डोनाल्ड ट्रंप यांनी हे सगळं नाव बदलण्याचा प्रयत्न केलाय कारण डोनाल्ड ट्रंप यांच म्हणण आहे की हे जे नाव भयानक दाखवल जातय की एआय मुळे असं होईल तसं होईल हे सगळं होक्स आहे म्हणजे हे सगळं खोट आहे.
चीनला खुश करण्यासाठी हे सगळं केलं जात आता चीनचा संबंध कसा येतो याच लॉजिक डोनाल्ड ट्रंप यांना विचारायचं नाही पण त्यांच म्हणण की हे चीनला खुश करण्यासाठी केलं जात.
व्हाईट हाऊस अकॉर्ड ऑन सुपर इंटेलिजन्स
मग 29 सप्टेंबरला व्हाईट हाऊस मध्ये एक मोठा कार्यक्रम झाला.
गुगल चे सुंदर पिचाई
मेटाचे मार्क जुकरबर्ग
एनविडियाचे जेनसेवा
ओपन एचे ग्रेक ब्रॉकमन
अंथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोडे
या सगळ्यांनी व्हाईट हाऊस अकॉर्ड ऑन सुपर इंटेलिजन्स वर सही केली.
त्या अंतर्गत
नियंत्रण
देखरेख
टीम बाहेरून ऑडिट
स्वतंत्र देखरेख मंडळ
असं बरच काही काही त्याच्यामध्ये आहे पण याच्यामध्ये एकमेक आहे हा अजूनही कायदा नाही हा पूर्णपणे स्वेच्छेचा करार आहे.
ट्रम्प त्याला म्हणतात मोरली बाईडिंग आणि त्यानंतर जी एक चर्चा झाली पत्रकारांच्या बरोबर त्यावेळी देखील सर्वांनी एआयचा उल्लेख एसआय असाच केला म्हणजे हे सगळं नैतिक दृष्ट्या बंधनकारक असणार आहे.
कायदेशीर बंधन अजून जस जरी नसलं तरी येणाऱ्या काळात ते येऊ शकतं.
विशेष म्हणजे झुकरबर्ग आणि जेन्सन हुवांग यांनी या अगोदर अशा प्रकारचं नाव बदल करायला विरोध केला होता पण तरीही सही करायला तेच पुढे होते म्हणूनच सिनेटर मार्क वॉर्नर यांनी टोला लगावला की ट्रंप यांनी नाव बदललं आणि कंपन्यांना सांगितलं आता तुमचा नियमन म्हणजे जे काही कंट्रोल आणि मॅनेजमेंट आहे ते तुमचं तुम्हीच करा.
Super Intelligence नावाच्या निर्णयाची दुसरी बाजू
अर्थात याची एक दुसरी बाजू ऐकायला हवी आणि ती समर्थकांची आहे आणि ती म्हणतात की आर्टिफिशियल या शब्दामुळे हे तंत्रज्ञान नकली वाटत होतं नवव आत्मविश्वास देतं चीन विरुद्ध शरियती जी चालू आहे.
अमेरिकेची त्यामध्ये अमेरिका मागे हटणार नाही हा स्पष्ट संदेश जगाला जातो औद्योगिक क्रांतीपेक्षा मोठ्या असलेल्या गोष्टीची वाढ आपण रोकणार नाही असं ट्रंप म्हणालेत कारण अनेकांनी ठरवलं होतं की हे कुठेतरी थांबवायला पाहिजे ट्रंप यांचं म्हणण आहे की थांबवायची काही गरज नाही आणि कंपन्यांनी किमान कागदावर तरी सुरक्षेची बांधी की मान्य केली हे खरं आहे.
त्यातून मजेशीर म्हणजे एक उलटा सिद्धांत आहे की एआय कंपन्यांचे हे जे काही घडणार आहे समोर माणसं मरणार वगैरे वगैरे हे सगळं मार्केटिंग आहे प्रत्येकाला आपलं प्रॉडक्ट किती पावरफुल आहे.
दाखवायचे आपले शेअर्स मार्केटमध्ये आणायचेत एका सर्वेक्षणात 26% लोकांना असंच वाटतंय की हे सगळं खोटं खोटं फक्त लोकांना दाखवण्यासाठी केलं जातंय.
भारतावर AI ते SI बदलाचा काय परिणाम होणार?
आता महत्त्वाचा प्रश्न भारतावर याचा काय परिणाम होणार.
तर भारतावर काहीही डायरेक्ट परिणाम होणार नाही पण यूएन सारख्या मंचावर आता अमेरिकेची कागदपत्र एसआय म्हणतील आणि बाकीच जग एआय म्हणेल त्यामुळे शब्दांचा गोंधळ मात्र होणार आहे.
AI ते SI नाव बदलल्यामुळे तंत्रज्ञान बदलतं का?
आता परत जाऊयात 23 सप्टेंबरच्या त्या मेल कड अधिकाऱ्यान आपल्या रिपोर्टमध्ये एआय खोडलं आणि एसआय लिहिलं कागदावर एक अक्षर बदललं पण सर्वर तेच आहेत कोड तेच आहेत कंपन्या त्याच आहेत आणि कॉक्सेनने दिशे दिलेला इसारा देखील अजून तिथेच आहे.
समुद्राचं नाव बदललं म्हणून पाणी बदलत नाही आणि ज्या नावाची निवड झाली त्याचा खरा अर्थ वाचला तर एकच प्रश्न उरतो तो म्हणजे अमेरिकेने पुढचा जो धोका आहे तो लपवण्यासाठी हे नाव बदललंय काय म्हणजे उद्या सुपर इंटेलिजन्स तयार झालाच तर तो सुपर इंटेलिजन्स कुणाला वाटणारच नाही कारण नाव जुनं झालेला असेल आणि तो सुपर इंटेलिजन्स फक्त अमेरिकेकडे असेल.
ज्याच्या जीवावर अमेरिका संपूर्ण जगाला वेठीला धरेल अर्थात अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प असू देत किंवा कुठलाही दुसरा व्यक्ती असू दे तो माणूस जगासाठी तेवढाच धोकादायक असणार आहे.
पण किमान ही गोष्ट डोनाल्ड ट्रम्प असेपर्यंत तरी होऊ नये एवढीच अपेक्षा आपण ठेवू शकतो म्हणजे सुपर इंटेलिजन्स अचीव्ह होऊ नये अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो नाहीतर दुर्दैवानं आपण सध्या अशा अवस्थेत आहोत की जिथं आपण यांना थांबवू शकत नाही.
चीन सोडला तर जगाच्या कुठल्याही राष्ट्रामध्ये विशेषतः सॉफ्टवेअर मध्ये पावरफुल असणाऱ्या भारतासारख्या राष्ट्रामध्ये देखील अँथ्रोपिक किंवा ओपन एआय किंवा Google यांना चॅलेंज करण्याची त्यांच्या एआय बरोबर कम्पीट करण्याची स्पर्धा करण्याची ताकद राहिलेली नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे.
FAQ
1. SI म्हणजे काय?
SI म्हणजे Super Intelligence. AI च्या संदर्भात हा शब्द अशा संभाव्य बुद्धिमान प्रणालीसाठी वापरला जातो जी अनेक क्षेत्रांमध्ये मानवी बुद्धिमत्तेपेक्षा अधिक सक्षम असू शकते.
2. AI आणि Super Intelligence मध्ये काय फरक आहे?
AI म्हणजे Artificial Intelligence, तर Super Intelligence ही AI च्या भविष्यातील संभाव्य अधिक प्रगत अवस्थेची संकल्पना आहे. Super Intelligence ही संकल्पना सध्याच्या सामान्य AI प्रणालींपेक्षा खूप पुढची मानली जाते.
3. AI ऐवजी SI नाव वापरल्यामुळे AI तंत्रज्ञान बदलतं का?
नाही. नाव बदलल्यामुळे AI मॉडेल्स, कोड किंवा तांत्रिक क्षमता आपोआप बदलत नाहीत. हा मुख्यतः शब्दावलीशी संबंधित बदल आहे.
4. Super Intelligence सध्या तयार झाली आहे का?
Super Intelligence ही प्रामुख्याने भविष्यातील संभाव्य तंत्रज्ञानाची संकल्पना आहे. सध्याच्या AI प्रणालींना थेट मानवापेक्षा प्रत्येक क्षेत्रात श्रेष्ठ असलेली Super Intelligence म्हणता येत नाही.
5. AI Safety म्हणजे काय?
AI Safety म्हणजे AI प्रणालींचा विकास आणि वापर सुरक्षित पद्धतीने व्हावा, संभाव्य धोके कमी व्हावेत आणि आवश्यक नियंत्रण व देखरेख उपलब्ध असावी यासाठी केलेले प्रयत्न.
6. अमेरिकेतील हा बदल संपूर्ण जगाला लागू होतो का?
नाही. एखाद्या देशाच्या सरकारी कागदपत्रांमध्ये वापरली जाणारी शब्दावली आपोआप संपूर्ण जगासाठी बंधनकारक होत नाही. इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था त्यांच्या स्वतःच्या नियमांनुसार AI या शब्दाचा वापर करू शकतात.
7. भारतावर AI ते SI या बदलाचा काय परिणाम होईल?
तात्काळ थेट परिणाम होणे आवश्यक नाही. मात्र अमेरिका आणि इतर मोठ्या तंत्रज्ञान शक्ती AI च्या विकासासाठी कोणती दिशा आणि नियम स्वीकारतात, त्याचा भविष्यात भारताच्या AI धोरणांवर आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.
8. Super Intelligence धोकादायक ठरू शकते का?
याबाबत तज्ज्ञांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. काही AI Safety संशोधक भविष्यातील अत्यंत शक्तिशाली AI प्रणालींच्या संभाव्य जोखमींबाबत चिंता व्यक्त करतात, तर इतर तज्ज्ञ AI च्या विकासातून होणाऱ्या संभाव्य फायद्यांवर भर देतात.
9. AI चं नाव बदलणं महत्त्वाचं का मानलं जात आहे?
कारण AI ही संकल्पना आता केवळ सॉफ्टवेअर किंवा टेक्नॉलॉजीपुरती मर्यादित राहिलेली नाही. रोजगार, अर्थव्यवस्था, सुरक्षा, शिक्षण आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या विकासाशी AI जोडले गेले आहे. त्यामुळे त्यासाठी वापरली जाणारी सरकारी आणि सार्वजनिक शब्दावलीही चर्चेचा विषय बनते.
10. AI च्या भविष्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता?
भविष्यात AI अधिक शक्तिशाली झाल्यास त्याचा सुरक्षित, जबाबदार आणि नियंत्रित वापर कसा सुनिश्चित करायचा, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्नांपैकी एक आहे.
निष्कर्ष
AI ऐवजी SI म्हणजेच Super Intelligence हा शब्द वापरण्याचा निर्णय हा केवळ शब्द बदलण्यापुरता विषय नाही. या निर्णयामुळे AI च्या भविष्यातील क्षमतेबाबत, Super Intelligence च्या संकल्पनेबाबत आणि अशा शक्तिशाली तंत्रज्ञानावर नियंत्रण कसं ठेवायचं याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
नाव बदलल्यामुळे तंत्रज्ञानाची वास्तविक क्षमता बदलत नाही. AI चे मॉडेल्स, कोड, सर्व्हर्स आणि कंपन्या त्याच राहतात. मात्र एखाद्या तंत्रज्ञानाला कोणत्या नावाने संबोधलं जातं, यामधून त्या तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याबाबतची सार्वजनिक चर्चा नक्कीच बदलू शकते.
आगामी काळात AI अधिक शक्तिशाली होत गेल्यास AI Safety, मानवी नियंत्रण, पारदर्शकता, स्वतंत्र देखरेख आणि जबाबदारी हे मुद्दे अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत.
त्यामुळे आजचा खरा प्रश्न फक्त “AI ला काय म्हणायचं?” हा नाही.
खरा प्रश्न आहे — भविष्यातील अत्यंत शक्तिशाली AI प्रणाली विकसित झाल्यास तिच्यावर नियंत्रण कोणाचं असेल आणि तिचा वापर कोणत्या नियमांनुसार केला जाईल?
या प्रश्नांची उत्तरं पुढील काही वर्षांमध्ये AI च्या भविष्याची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

0 Comments