Elon Musk म्हणतात 2036 मध्ये पैशाला अर्थ उरणार नाही! AI आणि Robots मुळे जगात काय बदलणार? जगाच्या दुसऱ्या टोकाला टेक्सास मध्ये एका गिगा फॅक्ट्रीत बसून जगातला सर्वात श्रीमंत माणूस द इकॉनॉमिस्टच्या संपादिका झनी मिंटन बेडॉस यांना सांगत होता की 2036 मध्ये पैशाला काहीही किंमत राहणार नाही किंवा पैशाला काही अर्थ उरणार नाही .
रोबोट्स आणि एआय इतक उत्पादन करतील की मागणीची काही गरजच असणार मागणी सगळी संपून जाईल.एवढा हुशार माणूस हे सगळं असं का बोलतोय पैसा म्हणजे नेमका आहे तरी काय सप्लाय झाला तर गरीबी संपेल काय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इतिहासात असं कधी घडलंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.
Elon Musk चा युक्तिवाद काय आहे.?
इलॉन मस्कचा युक्तिवाद काय आहे ते समजून घेऊया कारण त्यांची टिंगल करणं सोपं जरी असलं तरी ती बौद्धिक दिवाळखोरी ठरेल कारण तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे पहिला ट्रिलियनर आहे या जगाच्या इतिहासातला कारण तो काही साधारण चिल्लर माणूस नाही त्यांचा तर्क चार पायऱ्यांचा आणि प्रत्येक पायरी स्वतंत्रपणे डिफेंड करण्यासारखी आहे.
- पहिली पैसा हे मुळात टंचाई वाटून घेण्याच साधन आहे म्हणजे वस्तू कमी असतात म्हणून त्यांना किंमत असते.
- दुसरी एआय आणि ह्युमनाईट रोबोट्स मिळून उत्पादनाचा खर्च जवळपास शून्यावर आणतील. मस्कचा अंदाज असा आहे की पुढच्या साधारण पाच वर्षात एआय माणसाच्या बुद्धीच्या पुढे जाईल आणि तो कॉसी इन्फायनाईट इकॉनॉमी अशी ज्याला अवस्था म्हणतात तशी अवस्था येईल.
- तिसरी बेडॉस यांनी त्याला महागाईचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की तशी काही अवस्थाच येणार नाही कारण महागाई ही पैशाचा पुरवठा आणि ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्यांच्या गुणोत्तरावर ठरते जर वस्तूच उत्पादन प्रचंड झालं तर सरकार पैसा छापून देखील किंवा न छापून देखील महागाई होणार नाही उलट डिफ्लेशन होईल म्हणजे पैशाला काहीच किंमत राहणार नाही.
- चौथी पायरी म्हणजे नोकऱ्या गेल्यानंतर लोकांचं काय या प्रश्नावर त्यांचं उत्तर सोपं होतं सरकारी तिजोरीतून लोकांना पैसे वाटले जातील पण याच मुलाखतीत त्यांनी एक तळ टीप ही जोडली जी बहुतेक हेडलाईन्स मध्ये आली नाही ती म्हणजे 2036 पर्यंत माणसाच्या हातून समाजाचं नियंत्रण सुटलेलं असू शकतं.
एआय आणि माणूस यांच्यातल बौद्धिक अंतर जर आता सध्या माणूस आणि चिंपांजी यांच्यामध्ये जेवढा अंतर आहे त्याच्यापेक्षा जास्त झालं तर एआयएच निर्णय घेईल माणूस का निर्णय घेईल आणि इलॉन मस पुढे म्हणतात हे थांबवण्याचा मार्ग मला दिसत नाही आणि थांबवण्याच बटन जरी असं तरी ते दाबाव की नाही याबद्दल मला शंका आहे हे लक्षात घ्या कारण पैशाला अर्थ उरणार नाही हे केवळ स्वप्नरंजन नाही त्यातला अर्धा भाग असा आहे की पैशाला अर्थ उरणार नाही कारण निर्णय घेणारे तुम्ही उरणार नाही आता याला पाठिंबा कोणी दिलाय ते बघा कारण पाठिंब्यातच सगळा खेळ आहे.
विनोद खोसला हे सिलिकॉन व्हॅली मधले बडे गुंतवणूकदार आहेत.बिलिनिअनिअर आहेत. तंत्रज्ञानाबद्दल कमालीच्या आशावादी आहेत. त्यांनी इलॉन मस्कला दुजोरा दिलाय. पण एक अट जोडलेली आहे ते म्हणतात की 2036 मध्ये पैशाला अर्थ राहणार नाही.
पण राजकारणाने जर ही विपुलता किंवा हे जो सप्लाय क्रिएशन आहे ते होऊ दिलं तर त्यांनी 2024 मध्ये स्वतः एक लेख लिहिला होता. ए आय डिस्टोपिया और युटोपिया आता ही अट वरवर छोटी वाटते पण खरंतर इलॉन मसचा संपूर्ण युक्तिवाद त्यावरून उलटा होऊ शकतो.
खोसला जे सांगताय ते हे की विपुलता निर्माण करणार जी तंत्रज्ञान आहे विपुलता न्यायान वाटणारी राजकीय इच्छाशक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि पहिली सोडवली म्हणजे दुसरी आपोआप सुटते असं नाही याचा अर्थ असं की कुठल्या डाव्या विचारवंताने किंवा इलॉन मस्कच्या टीकाकाराने हे म्हटलेलं नाही तर त्यांच्याच जगातल्या त्याच्याच बाजूच्या अब्जादीश गुंतवणूकदाराने हे म्हटलय म्हणजे या संपूर्ण चर्चेतला सर्वात प्रामाणिक हा मुद्दा आहे कारण जर सगळं सप्लाय निर्माण झाला तर तो लोकांच्या पर्यंत पोहोचणार कसा याच उत्तर सोडवाव लागेल.
या विषयाचा मुद्दा हा एका वाक्यात बसतो तंत्रज्ञान वस्तू निर्माण करू शकतं पण त्या वस्तू कोणाला मिळणार हे तंत्रज्ञान ठरवत नाही ते नेहमी सत्ता ठरवते आता आपण या दाव्याची इतिहासाच्या कसोटीवर तपासणी करूया आणि हा माझ्या मते सर्वात निर्णायक मुद्दा आहे विपुलतेने आजवर एकदाही कुठेही पैसा निरर्थक केलेला आज जगात दरडोई अन्नधा न्याचे उत्पादन जर बघितलं तर मानवाच्या इतिहासात सर्वाधिक आहे भारत हा अन्नधान्याचा निर्यातदार देश आहे आपण धान्य बाहेर पाठवतो तरीही याच देशात कोठ्यावधी लोक अर्धपोटी झोपतात
एफसीआयच्या गोदामांमध्ये धान्य सडत असतं त्याच वेळेला गोदामापासून 100 किलोमीटर वर कुपोषण असत हे चित्र कोणत्याही अर्थतज्ञाच्या स्पष्टीकरणाशिवाय समजतं यातून एक निष्कर्ष निघतो तो म्हणजे गरीब माणूस हा गरीब असतो याचं कारण वस्तूंची टंचाई नाही तर वाटपाची म्हणजे डिस्ट्रीब्यूशनची ची जी व्यवस्था आहे ती आहे. 10 पट जास्त धान्य पिकवलं तर उपासमार संपत नाही. फक्त सडणाऱ्या धान्याच प्रमाण वाढतं आणि इलॉन मस्कचा संपूर्ण युक्तिवाद नेमका इथेच कोसळतो.
तो एका उत्पादनाच्या उपायाने एक राजकीय समस्या सुटेल असं गृहीत धरतोय. उत्पादन ही एक इंजिनियरिंगची समस्या आहे म्हणजे ती करू शकतो
आपण त्याच्यावर काम करू शकतो एआय ती सोडवू शकतो वाटप ही सत्तेची समस्या आहे त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असायला पाहिजे आणि ती हजारो वर्षात कोणत्याही यंत्रान सोडवलेली नाही.
टायलर कोवेन आणि नो स्मिथ यासारखे अर्थतज्ञ याचं तांत्रिक रूप मांडतात. टंचाई नाहीशी होत नाही ती फक्त जागा बदलते आणि टंचाई जागा कशी बदलते ते तुमच्या स्वतःच्या घराच्या हिशेबात बघा. कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे, मुंबई एका सामान्य कुटुंबाचा सर्वात मोठा खर्च कोणता आहे टीव्ही, मोबाईल, कपडे, फ्रीज या वस्तू आहेत का नाही सर्वात मोठा खर्च असतो जमीन, घर, आरोग्य, शिक्षण, लग्न यासारख्या घरातल्या गोष्टी आता प्रामाणिकपणे विचार करा यापैकी कोणती गोष्ट रोबोट करू शकतो किंवा एआय करू शकतो जमीन एआय तयार करू शकत नाही.
पुण्यातल्या टू बीएचके ची किंमत ही बांधकामाच्या खर्चावर ठरत नाही तर ती ठरते कोणाला बांधायची आहे परवानगी आहे का नाही जमीन कुठे आहे त्याची मालकी कोणाकडे आहे अशा अनेक गोष्टींच्यावरती मेडिकल कॉलेजच्या जागा वाढवायला एआय लागत नाही राजकीय निर्णय लागतो.
समुद्रकिनारी दिसणार घर चांगल्या विद्यापीठातली एक जागा नामांकित डॉक्टरचा वेळ या सगळ्या गोष्टी रोबोट्सन किंवा एआयन फक्त गाड्या वेगाने बनवल्या म्हणून सुटणार नाहीत. उलट होत असं की जेव्हा वस्तू स्वस्थ होतात तेव्हा लोकांचे पैसे या मर्यादित गोष्टींच्याकडे वळतात आणि त्यांच्या किंमती अजून वाढतात गेल्या 30 वर्षात हेच घडतय टीव्ही स्वस्थ झाला जमीन महाग झाली मोबाईल मधलं कॅमेरा तंत्रज्ञान चमत्कारिक झालं आता जगातले महागडे महागडे कॅमेरे बिनकामी झाले पण खाजगी शाळेची फी द पट झाली.
ईलॉन मस्क ज्या गोष्टी स्वस्थ करण्याच वचन देतोय त्या आधीच स्वस्थ झालेले आहेत किंवा स्वस्थ होत चाललेले आहेत. ज्या महाग आहेत त्यांना त्याचं तंत्रज्ञान स्पर्श करत नाही हे वास्तव आहे.
तिसरा मुद्दा आहे वेळेच्या क्रमाचा इलॉन मस्क म्हणतोय नोकऱ्या गेल्या तर सरकार तिजोरीतून पैसे देईल यावर एकच प्रश्न आहे कोणतं सरकार? भारत सार्वजनिक आरोग्यावर जीडीपीच्या साधारण 2 टक्के खर्च करतो नायजेरिया पाकिस्तान बांगलादेश यांच्याकडे एवढे सुद्धा पैसे नाहीत. म्हणजे ज्या देशांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्येला गरज आहे या पैशाची त्यांच्याकडे सर्वात कमी पैसा आहे आणि दुसरीकडे रोबोट शेप्स आणि कॉम्प्युटर यांची मालकी अमेरिका आणि चीनकडे राहणार आहे.
विपुलता तिकडे तयार होईल आणि बेरोजगारी सगळीकडे जगभर तयार होईल म्हणजे खोसलाशी जी अट आहे फक्त जर राजकारणाने ते होऊ दिलं तर किती भयानक आहे हे इथं लक्षात येत आणि क्रमाचा प्रश्न याहून महत्त्वाचा आहे.
नोकऱ्या जाणं आधी घडतं विपुलतानंतर येईल जर ती आली तर 45 वर्षांचा ट्रक ड्रायव्हर पुण्यातला कॉल सेंटरमध्ये काम करणारा तरुण एखाद्या फर्म मध्ये जुनियर अकाउंटंट म्हणून काम करणारा व्यक्ती यांच उत्पन्न 2029 मध्ये बंद होईल यामुळे विपुलता समजा आलीच तर 2040 मध्ये येईल मधल्या 11 वर्ष लोकांनी काय करायचं इलॉन मस्क कडे याचं उत्तर नाही तो त्या काळाला बंपी म्हणजे खडतर म्हणतो पण खडतर म्हणजे काय खडतर बोलायला इलॉन मस्कला सोपा आहे एक दशकभर उपासमार भारताची अडचण ही विशेष आहे
आपली सेवानिर्यातीची व्यवस्था आहे बीपीओ आयटी सर्विसेस बॅक ऑफिस ही जगातली सर्वात सहज स्वयंचलित करता येणारी ऑटोमेटेड एक मोठी रोजगार व्यवस्था या संक्रमणात गमावण्यासारखं सर्वात जास्त काय असेल तर ते भारताकडे आहे आणि सावरण्याची व्यवस्था सर्वात कमी आहे आणि शेवटी याचा सर्वात सोपा कस लावायचा तर्कशुद्ध कस लावायचा तर 27 जुलैला नोबेल विजेते अर्थतज्ञ डॅरन एस मगलू यांनी एका मुलाखतीचा तुकडा सध्या शेअर केलाय त्यामध्ये त्यांनी ईलॉन मस्कला आव्हान दिलंय.
ते म्हणाले जर खरंच 2036 मध्ये पैशाला अर्थ उरणार नसेल तर तुमची जवळपास एक ट्रिलियन डॉलर ची संपत्ती 2036 च्या पूर्वी दान करण्याचं वचन देऊन टाका. त्यानं एआय बद्दलच्या तुमच्या बोलण्याला विश्वासारहता मिळेल आणि लोक मग त्याच्यावर विश्वास ठेवतील.
अब्जा दिशांच्या सत्तेबद्दल जगभर वाटणारी भीती थोडीशी कमी होईल. मस्कच यावर उत्तर आलय मी खरंच अशा प्रकारचं काहीतरी करणार आहे. मग अशा प्रकारचं काहीतरी काय असतय आता माझी प्रामाणिक भूमिका सांगतो आणि इथं मी दोन्ही बाजू मांडणार आहे. मस्क बद्दल एक गोष्ट खरी आहे की त्याची दिशा बरोबर असते पण वेळापत्रक चुकलेल असतं.
पुन्हा वापरता येणारी रॉकेट्स इलेक्ट्रिक गाड्या यांची एकेकाळी टिंगल झाली होती त्यामुळे त्याची तारीख जी आहे 2036 ती आपण नाकारू शकतो पण दिशा नाही आणि हे खरं त्याचे टीकाकार सुद्धा मान्य करतात एजीआय नंतरच्या अर्थव्यवस्थेच कोणाकडेही प्रारूप नाही
जर ऊर्जा जवळपास फुकट झाली आणि रोबोट्स रोबोट्स बनवू लागले तर भौतिक दारिद्र्य आपोआप संपू लागेल आणि ती मानवी इतिहासातली सर्वात मोठी कामगिरी ठरेल आक्षेप हा नाही की अशक्य आहे आक्षेप हा आहे की हे आता लगेच 2036 पर्यंत होणार नाही म्हणजे मोस्ट पॉसिबली होणार नाही आणि सर्वात आधी गरिबांसाठी तर मुळीच होणार नाही एआय टंचाई संपू शकेल लोभ संपू शकणार नाही
सत्ता असलेल्या माणसाला स्वतःहून वाटून द्यायला भाग पाडणारे यंत्र आजवर कोणीही बनवलेल नाही म्हणून त्या बस मधल्या ड्रायव्हच्या मुलाचे शिक्षण थांबवण्याची घाई करण्यात काही अर्थ नाही पैसा लागणार नाही असं सांगणारा माणूस हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि तो त्याचा एकही पैसा आज तरी सोडायला तयार नाही हे सत्य सगळ्यांनी यांनी मान्य केल पाहिजे.
😊हे पण वाचा 👉 Hindi AI Tutor Job | Work From Home | $35–$45/Hour कमाई
या संपूर्ण मुद्द्याबद्दल ईलॉन मस्कच्या या स्टेटमेंट बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा.अशाच माहिती साठी https://www.techvedh.com/ वर भेट द्यायला विसरू नका.

0 Comments