रतन टाटांचा टाटा समूह अशी जगभरात ओळख असलेल्या टाटा मध्ये उफाळलेल युद्ध आता आणखीनच मोठं होताना दिसतय. 150 वर्षांपेक्षा जास्त जुना आणि विश्वासू मानला जाणारा टाटा समूह सध्या एका कॉर्पोरेट युद्धाच्या उंबरट्यावर उभा आहे. टाटा समूहाची मुख्य होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा संसन्न बोर्ड आणि समूहाची मालकी मानली जाणारी टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झालाय. एका बाजूला आहेत टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोईल टाटा ज्यांच्याकडे टाटा सनशी तब्बल 66% मालकी आहे आणि विशेष वेटो पॉवर देखील आहे. तर दुसऱ्या बाजूला आहेत टाटा सनचे चेअरमन एन चंद्रशेखरन जे समूहाच्या प्रत्येक व्यवसायाची सूत्र सांभाळत आहेत. 17 सप्टेंबरला बॉम्बे हाऊस मध्ये पार पडलेल्या मीटिंग नंतर आता हा वाद आणखीनच चव्हाट्यावर आला आहे. नोहेल टाटांचा विरोध असताना सुद्धा चंद्रशेखरन यांना मिळालेली मुदतवाढ, आरबीआयचा शेअर बाजार लिस्टिंगचा दणका आणि चॅरिटी कमिशनरचा कायदेशीर पेज या तीन मोठ्या मुद्द्यांमुळे टाटा समूह बंडखोरीच्या उंबरठ्यावर आला असल्याचं म्हटलं जात आहे. नोएल टाटा आणि एन चंद्रशेखरण यांच्यामध्ये नेमका काय वाद चालू झाला आहे. टाटा समूहाच्या वादाची सगळी स्टोरी जाणून घेऊया.
हा सगळा वाद नेमका आहे काय?
ते बघण्या आधी टाटा समूहाची रचना समजून घेणे महत्त्वाच आहे. टाटा समूहाची रचना ही दुहेरी स्वरूपाची आहे ज्यामध्ये टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स या दोन वेगवेगळ्या संस्था येतात. 9 ऑक्टोबर 2024 ला रतन टाटा यांचे निधन झाल्यावर लगेच टाटा समूहाची मुख्य मालकी असलेल्या टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. तर टाटा समूहाची मुख्य नियंत्रक कंपनी असलेल्या टाटा सन्स मुख्य कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी ही 2017 ला एन चंद्रशेखरन यांच्याकडे देण्यात आली होती.
नोईल टाटा हे टाटा समूहाचे मालक आहेत तर एन चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे चेअरमन आहेत. जे प्रत्यक्ष व्यवसाय चालवतात. टाटा सन्स ही टाटा ग्रुपची मुख्य होल्डिंग कंपनी आहे. जी टीसीएस, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील यांसारख्या सगळ्या व्यावसायिक कंपन्यांचे शेअर्स सांभाळते.
टाटा सन्स मालकी कोणाकडे आहे?
तर टाटा सन्स मध्ये सर्वाधिक 66 टक्के हिस्सा हा टाटा ट्रस्टचा म्हणजेच मोईल टाटा यांचा आहे जे टाटा ट्रस्ट समूहाचे चेअरमन आहेत. टाटा सन्सच्या नियमावलीतल्या कलम 121 ए नुसार टाटा ट्रस्टला एक विशेष वेटो पावर मिळालेली आहे. याचा अर्थ असा होतो की टाटा सनच्या बोर्डाने घेतलेला कुठलाही मोठा निर्णय तोपर्यंत वैद्य ठरणार नाही जोपर्यंत टाटा ट्रस्टने नियुक्त केलेल्या डाय रेक्टरशी त्याला बहुमत किंवा सहमती मिळत नाही.
टाटा ट्रस्टने नियुक्त केलेले हे दोन नॉमिनी म्हणजे डिरेक्टर्स नेमके आहेत कोण
तर एक आहेत नोईल टाटा आणि दुसरे आहेत वेणू श्रीनिवासन. नियम असा सांगतो की टाटा सन्सन घेतलेल्या निर्णयाला या दोन डायरेक्टर्स बहुमत मिळत नाही तोपर्यंत तो निर्णय अवैध्य ठरतो.
टाटा समूहाचा मूळ वाद काय आहे .?
Tata Sons vs Tata Trusts वादाचं कारण काय या सगळ्या वादाची सुरुवात झाली ती एका पत्रान 12 ऑगस्टला टाटा सन्सचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी बोर्डाला एक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी फेब्रुवारी 2027 मध्ये आपला दुसरा कार्यकाळ संपल्यानंतर या पदावरन पाय उतार होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर 3 सप्टेंबरला टाटा सन्स नॉमिनेशन अँड रेमुनरेशन कमिटीची एक महत्त्वाची बैठक झाली. ही कंपनीची कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि उच्चस्तरीय नेतृत्वाचे निर्णय घेणारी एक महत्त्वाची कमिटी आहे. या कमिटीच्या बैठकीत एन चंद्रशेखरण यांनी 12 ऑगस्टला पुढील कार्यकाळ नको म्हणून लिहिलेल्या पत्रावरती चर्चा झाली. कमिटीने चंद्रशेखरण यांच्या गेल्या काही वर्षातल्या कामाच कौतुक करत टाटा समूहाच्या हितासाठी त्यांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा अशी विनंती केली. मग कमिटीन एक मतान चंद्रशेखरण यांच्या नावाचा प्रस्ताव पुढच्या बोर्ड बैठकीसाठी मंजूर केला होता.
आता या कमिटीमध्ये नेमके कोण कोण आहेत?
तर या कमिटीचे अध्यक्ष आहेत हरीश मनवाणी सोबतच वेणू श्रीनिवासन हे देखील या कमिटीचा भाग आहेत शिवाय ते टाटा ट्रस्टचे नामांकित संचालक सुद्धा आहेत अनिता एम जॉर्ज आणि एन चंद्रशेखरण हे दोघेही या कमिटीचे सदस्य आहेत पण त्यांच्या स्वतःच्याच नियुक्तीचा विषय असल्याने त्यांनी या प्रक्रियेतील निर्णयापासून स्वतःला दूर ठेवलं होतं पुढे काय झालं तर 17 सप्टेंबरला मुंबईतल्या बॉम्बे हाऊस इथे टाटा संस्था संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नॉमिनी डायरेक्टर्स नोहेल टाटा आणि वेणू श्रीनिवासन देखील होते. शिवाय इतर डायरेक्टर्स हरीश मनवानी, एन चंद्रशेखरण आणि मल्लिका श्रीनिवासन हे देखील उपस्थित होते. बैठक सुरू झाली तेव्हा अजेंड्यावर दोन महत्त्वाचे विषय होते.
रिझर्वह बँकेने टाटा संस्था एनबीएफसी नोंदणी रद्द करण्याचा अर्ज नाकारल्यामुळे निर्माण झालेली कायदेशीर परिस्थिती आणि दुसरा विषय म्हणजे चेअरमन एन चंद्रशेखरण यांच्या मुदत वाढीचा प्रश्न. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या एनआरसी कमिटीच्या शिफारसीनुसार चंद्रशेखरण यांच्या नावे फेर नियुक्तीचा प्रस्ताव बोर्डासमोर ठेवण्यात आला. दरम्यान एन चंद्रशेखरट यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आणि स्वतःला टाटा संस चेअरमन पदाच्या पुढच्या कार्यकाळासाठी उमेदवार म्हणून समोर ठेवलं या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आणि लगेचच एन चंद्रशेखरण हे स्वतः या पदाचे उमेदवार असल्यानं त्यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे नियम पाळत या प्रक्रियेतन आणि मतदानापासून स्वतःला दूर ठेवलं या चर्चे दरम्यान टाटा ट्रस्टचे चेअरमन नोईल टाटा यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यांनी बोर्डाला आठवण करून दिली की चंद्रशेखरण यांनी 12 ऑगस्टला स्वतःहून पुढचा कार्यकाळ नको असल्याच लेखी लिहून दिलेलं आणि तेच अंतिम मांडलं गेलं पाहिजे.
जेव्हा चंद्रशेखरण यांच्या पाच वर्षांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर प्रत्यक्ष मतदान झालं तेव्हा बोर्डामध्ये उभी फूट पडली. नोएल टाटा यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं तर दुसरे डिरेक्टर्स असणारे वेणू श्रीनिवासन यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं. बोर्डातील इतर स्वतंत्र संचालक हरीश मनवानी अनिता जॉर्ज आणि मल्लिका श्रीनिवासन यांनी देखील प्रस्तावाच्या बाजूने कौल दिला. नोवेल टाटा यांच्या विरोधानंतर ट्रस्टच्या दोन संचालकांमध्ये एक एक अशी बरोबरी झाली. टाटा संश नियमावलीतील कलम 121 ए नुसार टाटा संस कोणताही मोठा निर्णय मंजूर होण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सर्व नॉमिनी डिरेक्टर्स बहुमत आवश्यक असतं.
नोएल टाटा यांनी या नियमाचा आधार घेत आपल्या वेटो पावरचा दावा केला. पण टाटा संश बोर्डान आणि कंपनी सेक्रेटरीन एका कायदेशीर सल्ल्याचा यासाठी आधार घेतला. ट्रस्टच्या दोन संचालकांमध्ये मतभेद झाल्याचा आणि तांत्रिक कोंडीचा फायदा घेत नोएल टाटा यांचा वेटो बाजूला सारण्यात आला आणि चार एक अशा बहुमतान चंद्रशेखरण यांच्या पुनर्नियुक्तीवर शिक्कामर्तप करण्यात आलं पण नोयल टाटा हे एन चंद्रशेखरण यांना विरोध का करतायत तर नोएल टाटा यांच असं मत आहे की चंद्रशेखरण यांनी 12 ऑगस्टला स्वतःहून पदावरन पाय उतार होण्याचा निर्णय घेतलेला आणि या नियमानुसार नवीन चेअरमन शोधण्यासाठी सिलेक्शन कमिटी स्थापन करायला हवी होती जी झालीच नाहीये याशिवाय टाटा समूहाच्या अंतर्गत नियमानुसार एक्झिक्युटिव्ह 65 व्या वर्षी निवृत्त होतात.
पाच वर्षांच्या मुदतवाढीमुळे चंद्रशेखरण वयाच्या 70 वर्षांपर्यंत पदावर राहतील जो नियमांचा भंग आहे. नोएल टाटा यांनी असही मांडलय की चंद्रशेखरण यांची टाटा सन्स बोर्डावरील डिरेक्टर पदाची नियुक्तीच वार्षिक सर्वसाधारण सभेत अद्याप प्रलंबित आहे. जे व्यक्ती डिरेक्टर म्हणून मंजूर नाही त्याला चेअरमन बनवणं बेकायदेशीर आहे. याव्यतिरिक्त नोएल टाटा आणि टाटा ट्रस्टचा एक मोठा वर्ग एन चंद्रशेखरण यांच्या व्यावसायिक निर्णयांवर नाराज आहे. विशेषत: एअर इंडिया आणि टाटा डिजिटल यांसारख्या तोट्यात चाललेल्या उपक्रमांमध्ये हजारो कोटी रुपयांच भांडवल हे गुंतवलं जातय. ट्रस्टला मिळणारा डिविडेंड कमी होत असल्यामुळे सामाजिक कामासाठीचा निधी धोक्यात आला आहे असा देखील आरोप नोएल टाटा यांनी केला आहे.
या वादामध्ये आणखी एक मोठा मुद्दा समोर आला. ज्यामुळे अंतर्गत मतभेद चांगलेच ताणले गेले. आरबीआयने 11 सप्टेंबरला टाटा सनची कोर इन्हेस्टमेंट कंपनी आणि गैर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणजे एनबीएफसी म्हणून असलेली नोंदणी रद्द करण्याची याचिका फेटाळली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये आरबीआय न टाटा संसन्सला अप्पर लेयरल एनबीएफसी च्या श्रेणीमध्ये टाकलं होतं आणि नियमानुसार तीन वर्षांच्या आत शेअर बाजारात लिस्ट होण्याचे आदेश दिले होते. मात्र टाटा समूहाला हा आयपीओ आणि सरकारी नियंत्रण नको होतं त्यांना कंपनी पूर्णपणे खाजगी ठेवायची होती.
आरबीआयनी याचिका फेटाळल्यामुळे टाटा सन साठी खाजगी राहण्याचा शेवटचा कायदेशीरमार्ग बंद झालेला आहे. आता टाटा सन्सला कोणत्याही परिस्थितीत शेअर बाजारात लिस्ट व्हाव लागणार आहे आता याच कारणामुळे 17 सप्टेंबरच्या बोर्ड बैठकीत एन चंद्रशेखरण यांच्या नेतृत्वाखालच्या बोर्डान आयपीओच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला तर नोएल टाटा यांनी याला कोर्टामध्ये आव्हान देण्यासारखे इतर पर्याय तपासावेत अशी भूमिका घेतली आहे. वेणू श्रीनिवासन, विजय सिंग आणि टाटा सर्स मध्ये 18.37 टक्के हिस्सा असणारे शहापूरजी पालंजी ग्रुप लिस्टिंग करण्याच्या बाजूने आहेत तर नोयल टाटा आणि काही माजी संचालक लिस्टिंगच्या पूर्णपणे विरोधात आहेत.
टाटा सन्स ही 158 वर्ष जुनी संस्था आहे जिचा नफा समाज उपयोगी कार्यासाठी वापरला जातो. कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली तर परदेशी आणि संस्थागत गुंतवणूकदारांचा दबाव वाढेल. कंपनीला सामाजिक जबाबदारी पेक्षा केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित कराव लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिस्टिंग मुळे टाटा ट्रस्टचे टाटा सन्स वरील कलम 121 अंतर्गत असलेले विशेष अधिकार आणि वर्चस्व संपुष्टात येईल असा दावा नोईल टाटा यांच्याकडन करण्यात आला आहे. नेतृत्वाच्या बहुमताच्या निर्णयानंतर आता आरबीआयच्या नियमांचे पालन करण्यासाठी आणि कायदेशीर कोंडी टाळण्यासाठी टाटा संस्थ शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या पुढच्या प्रक्रियेला सुद्धा बोर्डान मंजुरी दिली आहे.
खरं तर बैठक संपल्यानंतर दोन्ही बाजूंनी पत्रकांचे युद्ध देखील छेडलं गेल आहे. चंद्रशेखरन यांनी बोर्डाच्या विनंतीचा मान राखून आपला निर्णय बदलला असून त्यांचा कार्यकाळ पुढच्या पाच वर्षांसाठी वाढवला आहे आणि आरबीआयच्या नियमांच पालन देखील केल जाईल असं पत्रक त्यांनी जाहीर करून सांगितलय तर दुसरीकडे नोईल टाटा यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून स्पष्ट केलं की हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आणि अवैध्य आहे. आम्ही या विरोधात आमची असहमती नोंदवली आहे. त्यांनी संकेत दिलेत की आगामी वार्षिक बैठकीत 66% शेअरच्या तागदीवर ते चंद्रशेखरण यांना संचालक पदावरन हटवण्यासाठी मतदान करू शकतात.
त्यामुळे आता जरी बोर्डान चंद्रशेखरण यांच्या बाजूने निर्णय घेतला असला तरी अंतिम निर्णय हा शेअर होल्डर्सचाच असणार आहे हे स्पष्ट आहे. पण इथे सुद्धा एक मोठा कायदेशीर पेस निर्माण झाल्याच दिसून येतं. 18 ऑगस्टला आयोजित करण्यात आली टाटा सनशी अन्युअल जनरल मीटिंग आवश्यक उपस्थिती पूर्ण न झाल्याने रद्द करण्यात आली आहे. नियमानुसार सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या संयुक्त प्रतिनिधींची उपस्थिती या बैठकीला आवश्यक असते. पण 23.56% 56% शेअर्स असणाऱ्या सर रतन टाटा ट्रस्टवर महाराष्ट्र चॅरिटी कमिशनरन स्थगितीचा आदेश दिला आहे त्यामुळे ते आपला प्रतिनिधी पाठवू शकत नाहीत जोपर्यंत हा कायदेशीर गुंता सुटत नाही आणि अन्युअल जनरल मीटिंग होत नाही तोपर्यंत एन चंद्रशेखरण यांच्या नियुक्तीवर अंतिम मोहर लागू शकत नाही.
थोडक्यात सांगायचं तर टाटा सन सध्या तीन मुद्द्यांवर संघर्ष करतीय चेअरमन पदावरन नोएल टाटा विरुद्ध चंद्रशेखरण यांचा संघर्ष आरबीआय च शेअर बाजारात लिस्टिंग करण्याचे दिलेले आदेश आणि टाटा ट्रस्ट आणि चॅरिटी कमिशनर मधली कायदेशीर लढाई.
😊हे पण वाचा 👉 Tata Sons मध्ये मोठा बदल! N. Chandrasekaran यांचा राजीनामा, आता नवीन Chairman कोण?
तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं नोएल टाटा आणि एन चंद्रशेखरण यांच्यामध्ये सुरू असलेल्या या वादाबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि अशाच माहिती साठी https://www.techvedh.com/ वर भेट द्यायला विसरू नका.

0 Comments