700 एजंट्स चा सायबर अटॅक Open AI लाच एजंट्सनी फसवल हो असच झाले आहे, Open AI ची टेस्ट, 700 पेक्षा जास्त AI Agents चा Hugging Face वर Cyber Attack, विषय काय झाला.? हाच विषात आत्ता जास्त चर्चेत आहे नेमकं काय घडलं कसा अटॅक झाला Hugging Face या AI Agentsच्या जाळ्यात कशी अडकली याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
एआय एजंट्स म्हणजे काय?
एआय एजंट्स तुम्ही दिलेला एखादा टास्क कम्प्लीट करणारी एक यंत्रणा जेव्हा आपण एआयला एखादं काम सांगतो तेव्हा ते काम पूर्ण करण्यासाठी एआय त्याला शक्य ते सगळे प्रयत्न करून आपल्याला रिझल्ट देण्याचं काम करतो पण या एआय एजंट्सनी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त स्मार्ट वर्क केलं तर हेच एआय एजंट आपल्यासाठी धोकादायक सुद्धा ठरू शकतात.
एआय एजंट्स धोकादायक कसे ठरू शकतात.
एआय एजंट्सनी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त स्मार्ट वर्क केलं तर हेच एआय एजंट आपल्यासाठी धोकादायक सुद्धा ठरू शकतात.
असंच काहीस घडलं अमेरिकेतल्या हगिंग फेस या कंपनी सोबत जुलै महिन्यात या कंपनीच सर्वर अचानक हॅक झाला आता ही काही साधी गोष्ट नव्हती.
हगिंग फेसचा सर्वर हॅक.
जगभरातल्या लाखो डेव्हलपर्सचा कंपन्यांचा एआय संबंधित डेटा या कंपनीच्या सर्वरवर स्टोर आहे त्यामुळे त्याचा सर्वर हॅक होणं हा सायबर सिक्युरिटी मधला सगळ्यात मोठा धोका होता पण हा सायबर अटॅक झाला कसा कोणी केला याची शोधाशोध सुरू झाली आणि एक धक्कादायक गोष्ट समोर आली.
ओपन एआयच्या 700 एजंट्सनेच हगिंग फेस सर्वर हॅक केल्याचं समोर आलं याचं कारण ठरली ती एआय एजंटची एक परीक्षा नक्की झालं काय हगिंग फेसचा सर्वर वर एआय एजंट्सनी हॅक कसा केला आणि यामागचं नेमकं कारण काय होतं सगळं जाणून घेणार आहोत.
एआय आणि एआय एजंट यांच्यातला फरक.?
आपल्याला एआय आणि एआय एजंट यांच्यातला फरक समजून घ्यावा लागेल एक उदाहरण घेऊयात समजा आपल्याला एखादं चांगलं हॉटेल शोधायचं असेल तर आपण एआय चॅट बॉटशी चॅट करून त्यावरून हॉटेलची माहिती घेतो पण एआय एजंट यापेक्षा एक स्टेप पुढे असतात
या एजंट कडून आपल्याला हॉटेलची माहिती तर मिळेलच पण त्या हॉटेलला रिव्ूज कसे आहेत ते आपल्यापासून किती लांब आहे तिथे कसं पोहोचायचं इथपासून ते हॉटेलमध्ये रूम बुक करण्यापर्यंतच सगळं काम एआय एजंट कडून केलं जातं. थोडक्यात विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तर देणं हे साध्या एआय च काम आहे तर एआय एजंटला आपण एखादा टास्क देतो आणि एजंट स्वतः हा टास्क पूर्ण करतो.
सँडबॉक्स म्हणजे काय?
टास्क कम्प्लिशन साठी अर्थातच एआय एजंट्सना ऍडव्हान्स टूल्स ची गरज असते आता एआय च हे सगळं काम चालतं ते सँडबॉक्सच्या माध्यमातून सँडबॉक्स म्हणजे काय तर जेव्हा एआय एजंटला एखादा टास्क दिला जातो तेव्हा तो टास्क पूर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र आभासी सिस्टम तयार केली जाते.
थोडक्यात एआय मॉडेलला एखादं काम करण्यासाठी प्रत्यक्ष इंटरनेट किंवा कंपनीच्या मेन सिस्टमवर काम करण्यासाठी थेट सोडलं जात नाही त्याऐवजी त्याला एका वेगळ्या मर्यादित डिजिटल वातावरणात चाचणी केली जाते यालाच सँडबॉक्स म्हणतात.
म्हणजेच प्रत्यक्ष मॅचच्या आधी जसा क्रिकेटर नेट प्रॅक्टिस करतो तसच एआय एजंट सँडबॉक्स मध्ये डमी प्रोग्रामवर ऍक्शन्स करून मुख्य टास्क पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात आता सँडबॉक्स ही एक आभासी सिस्टम असल्यामुळे तिथे काम करण्यासाठी एआय एजंट्सवर काही निर्बंध असतात काही टेस्ट मध्ये एआयला थेट इंटरनेट एक्सेस दिला जात नाही.
आर्टिफॅक्टरीची भूमिका.
प्रोग्रामवर काम करण्यासाठी एआयला काही आवश्यक सॉफ्टवेअर पॅकेजेस डाऊनलोड आणि इन्स्टॉल करावी लागतात यासाठी ओपन एआय कडून एक अंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यात आलय ज्याचं नाव आहे आर्टिफॅक्टरी हीच आर्टिफॅक्टरी हगिंग फेस कंपनीच्या सायबर अटॅकला कारणीभूत ठरली आहे
एआय एजंट्सने कंपनीचा सर्वर हॅक कसं केलं.
कोणत्याही एआय कंपनी कडून आपल्या नवीन मॉडेल आणण्याआधी त्याच टेस्टिंग केलं जातं एखाद्या सॉफ्टवेअर मधल्या त्रुटी शोधून त्याबाबत अलर्ट देण्याचं काम या टेस्ट दरम्यान केलं जातं जेणेकरून सॉफ्टवेअर डेव्हलप करताना सायबर सिक्युरिटी बेंचमार्क सेट करणं सोपं जातं आता ओपन एआय कडून याचसाठी एक्सप्लईट जिम ही टेस्ट घेण्यात आली या टेस्ट दरम्यान एआय एजंट्सना खूप कॉम्प्लिकेटेड टास्क देण्यात आले होते.
ओपन एआयन सांगितल्यानुसार 898 पैकी 198 टास्क असे होते ज्याच सोल्युशन कोणत्याही एआय मॉडेलला शोधता आलं नव्हतं. आता ज्या मॉडेलच्या माध्यमातून एआय एजंटची ही टेस्ट होत होती ते ओपन एआयचं इंटरनल रिसर्च मॉडेल होतं.
या टेस्ट साठी प्रत्येक एआय एजंटला एकमेकांपासून स्वतंत्र ठेवण्यात आलं होतं. या टेस्ट मधले टास्क पूर्ण करता येत नसल्यामुळे ए आय एजंट्सनी परीक्षेची तयारी न झालेल्या मुलांसारखाच टिपिकल विचार केला.
कॉपी करायचा उत्तर शोधण्यापेक्षा कुठे रेडीमेड उत्तर मिळतय का याचा शोध हे एजंट घ्यायला लागले यासाठी अर्थातच इंटरनेटचा पूर्ण एक्सेस मिळवणं या एजंट साठी महत्त्वाचं होतं.
आता सँडबॉक्स मध्ये इंटरनेटचा मर्यादित एक्सेस असल्यामुळे या एआय एजंट्सनी या सँडबॉक्स मधून बाहेर पडून इंटरनेट पर्यंत पोहोचायचं ठरवलं आणि इथूनच हे एआय एजंट्स हगिंग फेसच्या सर्वर पर्यंत पोहोचले एआय एजंट्सना इंटरनेटचा एक्सेस नसला तरी आर्टिफॅक्टरीला ला सॉफ्टवेअर पॅकेजेस डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट वापराव लागत होतं याचाच फायदा या एजंट्सनी घेतला.
त्यांनी आर्टिफॅक्ट्रीच्या माध्यमातूनच बाहेरच्या इंटरनेटशी कनेक्ट व्हायला सुरुवात केली. 12 मे 2026 ला एका एआय एजंटन ओपन एआयच्या आर्टिफॅक्ट्रीवर एक नोट पाठवली यामध्ये त्याने एका हरवलेल्या फाईल बद्दल विचारलं होतं कुणाला ही फाईल सापडली आहे का असं या नोटमध्ये लिहिण्यात आलं होतं आता एआय एजंट्सना एकमेकांशी थेट संवाद साधता येत नसला तरी आरटी फॅक्ट्रीवर नोट पाठवणं शक्य होतं.
आर्टिफॅक्टरी अनधिकृत मेसेज बोर्ड बनला.
12 मेच्या या पहिल्या नोट नंतर इतर एजंट्सनी सुद्धा अशाच नोट लिहायला सुरुवात केली यामुळे आर्टिफॅक्टरी हे पॅकेज रिपोझिटरी न राहता एआय एजंट साठी तो एक अनधिकृत मेसेज बोर्ड बनला यातूनच ते एकमेकांशी संवाद साधायला लागले.
मास कॉपीला सुरुवात.
एक एआय एजंट एखादी माहिती किंवा सूचना तिथे लिहून ठेवू शकत होता आणि दुसरा एआय एजंट ती माहिती वाचू शकत होता. यामुळे वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये स्वतंत्रपणे काम करण्यासाठी ठेवलेले एआय एजंट एकमेकांशी कोणालाही न कळता बोलायला लागले पुढच्या पाच दिवसात सुमारे बाराश एजंट्स एकमेकांशी बोलायला लागले आणि त्यांच्यात 70 हज पेक्षा जास्त फाईल शेअर झाल्या म्हणजेच जी परीक्षा कॉपी मुक्त व्हायची होती तिथे मास कॉपीला सुरुवात झाली.
इंटरनेटपर्यंत पोहोचण्याचा नवीन मार्ग.
12 मे नंतर दोन आठवड्यांनी 26 मे ला एका एआय एजंटन आर्टिफॅक्टरीचा वापर करून अनपेक्षित पद्धतीनं इंटरनेट पर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला. याची माहिती त्याने इतर एजंट सोबत आपल्या अनधिकृत मेसेज बोर्डच्या माध्यमातून शेअर केली.
एआय एजंट्सच्या दोन महत्त्वाच्या क्षमता.
एआय एजंट्स कडे दोन महत्त्वाच्या क्षमता आल्या होत्या. एक म्हणजे एकमेकांशी संवाद साधणं.
दुसरी म्हणजे थेट इंटरनेटचा एक्सेस मिळवणं.
आर्टिफॅक्टरी यंत्रणा बंद पडली.
एआय एजंटच्या हालचाली इतक्या वाढल्या की चार जुलैला आर्टिफॅक्टरी यंत्रणा अस्थिर झाली आणि शेवटी ती बंद पडली यानंतर ओपन एआयच्या माध्यमातून काही सुरक्षा त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या.
एआय एजंट्सनी पुन्हा संवादाचा मार्ग शोधला.
त्यावेळी एआय एजंट्स एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आर्टिफॅक्ट्रीचा वापर करत असल्याचं सिक्युरिटी टीमच्या लक्षात आलं नाही आर्टिफॅक्टरी सिस्टम पुन्हा सुरू करण्यात आली आता या एआय एजंटचा जुना मेसेज बोर्ड पूर्णपणे नष्ट झाला होता पण एआय एजंट्स थांबले नाहीत त्यांनी पुन्हा एकमेकांशी संवाद साधण्याचा मार्ग शोधला यावेळी या एजंट्सनी सिस्टम मधील डिरेक्टरीच्या नावांमध्ये मेसेजेस पाठवायला सुरुवात केली. याच काळात एजंट्सनी आर्टिफॅक्ट्रीच्या माध्यमातून पुन्हा इंटरनेट पर्यंत पोहोचण्याचा नवीन मार्ग सुद्धा शोधून काढला.
एआय एजंट्स एकमेकांना मदत करू लागले.
इथेच या सगळ्याचा पुढचा टप्पा सुरू झाला. वेगवेगळ्या कामांसाठी तयार करण्यात आलेले एआय एजंट्स आता फक्त आपापली काम करत नव्हते ते एकमेकांना मदत करायला लागले कोणत्या एजंटला कोणती माहिती सापडली कोणाला कोणत्या सिस्टम मध्ये प्रवेश मिळाला कोणाला नवीन टेक्निकल फॉल्ट सापडला ही माहिती नवीन मेसेज बोर्डवर शेअर व्हायला लागली.
हगिंग फेसच्या क्रेडेंशियल्सचा शोध.
10 जुलैला यामध्ये एक मोठा ट्विस्ट आला. एका एजंटला इंटरनेटवर सार्वजनिकपणे उघड झालेली हगिंग फेस या कंपनीची काही युजर क्रेडेंशियल्स मिळाली ही माहिती त्याने इतर एजंट सोबत शेअर केली यानंतर या क्रेडेंशियलचा वापर करून एआय एजंटनी हगिंग फेस्टच्या सिस्टम मधील आणखी तांत्रिक त्रुटी शोधल्या.
हगिंग फेसच्या सिस्टममध्ये प्रवेश.
या त्रुटी एकमेकांशी जोडून त्यांनी हगिंग फेस्टच्या काही सर्वरवर कोड चालवण्याची क्षमता मिळवली म्हणजेच इतके दिवस या एजंट्स कडून ही चोरी ओपन एआयच्या सँडबॉक्स द्वारे सुरू होती तीच चोरी आता ते एका थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करायला लागले होते हगिंग फेस या अमेरिकन कंपनीच्या सर्वरवर जगभरातल्या लाखो कंपन्या एआय डेव्हलपर्स आपली मॉडेल्स आणि डेटा सेट्स स्टोअर करून ठेवतात हीच सिस्टम या एआय एजंटच्या हाती लागल्यामुळे त्यांना आपल्या टास्क साठी उत्तर शोधणं सोपं झालं
क्रेडेंशियल्स आणि सिस्टममध्ये प्रवेश वाढला.
मग या एजंट्सनी हगिंग फेसच्या सर्वर वरून मोठ्या प्रमाणात क्रेडेंशियल्स मिळवल्या म्हणजेच हे एआय एजंट आता फक्त आपल्याला हवी असलेली माहिती शोधत नव्हते तर त्यांना बाहेरच्या सिस्टम मध्ये सक्रियपणे काम करता येत होतं त्यांनी अनेक हगिंग फेस क्लस्टर्स मध्ये आपला प्रवेश वाढवला ओपन एआयच्या एका अहवालानुसार या प्रक्रियेत एजंट्सना डेटाबेस मेसेजिंग सिस्टम कोड रिपॉझिटरीज आणि क्लाऊड सिस्टमशी संबंधित काही क्रेडेंशियल्स मिळाल्या.
19 जुलैला प्रकार उघडकीस.
19 जुलैला ओपन एआयच्या सायबर सुरक्षा मॉनिटरिंग सिस्टमन या असामान्य हालचाली ओळखल्या यानंतर तपास सुरू झाला. ओपन एआयन सुरू असलेल्या एक्सप्लईट जिम टेस्ट थांबवल्या. या अंतर्गत हालचालींचा आणि हगिंग फेस मधील घटनेचा संबंध जोडला गेला आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला.
एआय एजंट्सना हॅक करण्याच्या सूचना नव्हत्या.
ही सगळी टाईमलाईन बघितली तर या एआय एजंट्सना हगिंग फेसवर सायबर अटॅक करण्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या त्यांना ओपन एआय कडून फक्त एक्सप्लईट जिम या टेस्टच्या माध्यमातून सॉफ्टवेअर मधील त्रुटी शोधायच्या होत्या पण त्या न शोधता आल्यान या एआय एजंट्सनी हा नवीन मार्ग शोधला.
उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात एजंट्सने बाहेरील इंटरनेटवर शोध घेतला आणि ते थेट हगिंग फेसच्या सर्वर पर्यंत पोहोचले यामुळे आतापर्यंत हगिंग फेसच्या सिक्युरिटीला कोणतही नुकसान झालेलं नाही.
एआय एजंट्सच्या भविष्यातील धोक्याची झलक.
हगिंग फेसच्या बाबतीत घडलेली ही घटना फक्त एका कंपनीच्या सर्वरवरील सिक्युरिटी ब्रीच नाही ती एआय एजंटच्या भविष्यातल्या धोक्याची एक झलक असल्याचं आता बोललं जाऊ लागलंय.
निष्कर्ष
एआयला आपण टास्क देतो पण तो टास्क पूर्ण करण्यासाठी तो कोणता मार्ग निवडेल हे प्रत्येक वेळी आपल्याला माहित असेलच असं नाही आणि म्हणूनच आता एआय एजंट्स किती स्मार्ट आहेत यापेक्षा ते किती सुरक्षितपणे आणि आपल्या नियंत्रणात काम करतात हा प्रश्न जास्त महत्त्वाचा ठरणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हगिंग फेस बाबत घडलेली ही घटना भविष्यातील एआयचा धोका आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती Tech Vedh ला भेट द्या.

.png)
.png)
.png)
0 Comments