WhatsApp Marketing कसं करायचं? | Broadcast vs WhatsApp API

 

WhatsApp Marketing साठी WhatsApp Business वापरणारा भारतीय व्यवसाय

WhatsApp Marketing हा विषय सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, especially Indian context मध्ये. कारण भारतामध्ये WhatsApp वापरणाऱ्या लोकांची संख्या जगात सगळ्यात जास्त आहे. भारतात 500 million पेक्षा जास्त लोक WhatsApp वापरतात.

WhatsApp Marketing इतकं महत्त्वाचं का आहे? कारण भारतात WhatsApp messages ची open rate 90 ते 98% पर्यंत असल्याचं सांगितलं जातं. म्हणजे तुम्ही कोणाला WhatsApp वर message केला, तर तो message उघडण्याची शक्यता खूप जास्त असते.

याच्या तुलनेत Email ची average open rate 20 ते 30% आणि Organic Marketing ची 5 ते 10% असते.

आज आपण WhatsApp Marketing चे प्रकार, WhatsApp Broadcast आणि API मधला फरक आणि WhatsApp Strategy कशी वापरायची हे बघणार आहोत.


पुढे जाण्याअगोदर आपण काय-काय बघणार आहोत -

WhatsApp Marketing म्हणजे काय, ते किती प्रकारे करता येतं, WhatsApp Business आणि WhatsApp Business API मध्ये काय फरक आहे, Broadcast Strategy कशी वापरायची, WhatsApp Automation आणि Chatbot कसं काम करतं, Meta Ads आणि WhatsApp चं combination कसं वापरायचं आणि Business Owner, Student किंवा Freelancer म्हणून WhatsApp Marketing चा उपयोग कसा करता येतो हे आपण पाहणार आहोत.


WhatsApp Marketing म्हणजे काय?

WhatsApp Marketing द्वारे customers सोबत संवाद साधणारा भारतीय व्यवसाय मालक


WhatsApp Marketing म्हणजे customers सोबत WhatsApp वर connect होऊन तुमचा business grow करणं.

Customer सोबत connect होणं हे वेगवेगळ्या प्रकारे करता येतं.

1. Product आणि Service Promotion

नवीन product launch झालं की त्याची माहिती तुमच्या customers पर्यंत पोहोचवता येते.

तसंच नवीन offers, discounts आणि sales याबद्दलची माहितीही customers ला directly WhatsApp वर पाठवता येते.

2. Customer Support

Customers चे doubts आणि queries WhatsApp वरच resolve करता येतात.

3. Order Updates

तुमची order confirm झाली, order dispatch झाली किंवा order निघाली, असे सगळे updates automated पद्धतीने WhatsApp वर customers पर्यंत पोहोचवता येतात.

4. Relationship Building

Regular आणि valuable updates customers पर्यंत WhatsApp वरून पाठवता येतात.

यामध्ये tips, insights आणि important updates यांचा समावेश होतो. यामुळे लोक तुमच्यासोबत जास्त connect राहतात.


WhatsApp Marketing साठी तीन Options

WhatsApp Marketing साठी मुख्यतः तीन options आहेत:

  1. Regular WhatsApp App

  2. WhatsApp Business

  3. WhatsApp API

हे तीनही options वेगवेगळे आहेत. त्यामुळे या तिन्हीमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे.


WhatsApp Business आणि WhatsApp Business API मध्ये काय फरक आहे?

WhatsApp Business वर product catalog आणि customer chats manage करणारा व्यवसाय मालक


चला, आता WhatsApp Business आणि WhatsApp Business API मधला फरक बघूयात.

WhatsApp Business

WhatsApp Business हे Free मध्ये available आहे. ते Play Store किंवा App Store मधून download करता येतं.

यामध्ये तुम्ही Business Profile तयार करू शकता. त्यामध्ये:

  • Business Name

  • Address

  • Website

  • Description

ही माहिती add करता येते.

Catalog

तुमची Products किंवा Services Catalog मध्ये list करता येतात.

Quick Replies

तुमचे common messages save करता येतात आणि त्यांचा वापर करून पटकन reply देता येतो.

Labels

Customers ना वेगवेगळ्या categories मध्ये organize करण्यासाठी Labels वापरता येतात.

Broadcast List

एकाच वेळी multiple contacts ना message पाठवण्यासाठी Broadcast List वापरता येते.

Broadcast List ची एक मर्यादा आहे. Maximum 256 chats पर्यंत तुम्ही broadcast करू शकता.

पण यात एक महत्त्वाची गोष्ट आहे—ज्यांनी तुमचा number save केला आहे, त्यांच्यापर्यंतच तुमचा message पोहोचतो.

Customer ने reply केल्यावर तो individual chat मध्ये येतो.

Small Business साठी सुरुवातीला WhatsApp Business चांगलं आहे. पण जर तुम्हाला business scale करायचा असेल, तर हे sufficient नाही.


WhatsApp Business API

WhatsApp Business API द्वारे customer communication manage करणारी भारतीय business team


आता बघूयात WhatsApp Business API.

WhatsApp Business API हे official Meta product आहे आणि specially businesses साठी design केलेलं आहे.

Bulk Messaging

यामध्ये हजारो किंवा लाखो contacts ना एकाच वेळी messages करता येतात.

Automation

Chatbot आणि automated responses तयार करता येतात.

CRM Integration

Customer data सोबत WhatsApp connect करता येतं.

कोणाला message गेला, कोणी message उघडला आणि कोणी reply केला, हे सगळं समजतं.

Green Tick Verification

Official Business Badge मिळवण्याची सुविधा देखील आहे.


WhatsApp Business API साठी काय Requirements आहेत?

सगळ्यात first Meta Business Verification लागतं.

त्यानंतर third-party platforms वापरावे लागतात.

उदाहरणार्थ:

  • WATI

  • AiSensy

  • Interakt

यांची monthly cost ₹2,000 ते ₹5,000 पासून सुरू होते.


WhatsApp Business की WhatsApp Business API?

जर तुम्ही New Business Owner असाल, तर तुम्ही WhatsApp Business वर stick राहू शकता.

पण जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचा customer base 500 customers पेक्षा जास्त झालेला आहे, तेव्हा तुम्ही API कडे shift होऊ शकता.


WhatsApp Broadcast Strategy


WhatsApp Broadcast द्वारे अनेक customers ना message पाठवणारा व्यवसाय मालक


आता practically WhatsApp Broadcast Strategy बघूयात.

WhatsApp Broadcast साठी हे पाच Rules लक्षात ठेवा.

Rule 1: नेहमी Permission घ्या

Random लोकांना WhatsApp वर messages पाठवू नका.

ज्या लोकांनी WhatsApp updates किंवा WhatsApp messages साठी opt-in केलं आहे, त्यांनाच तुमचे updates पाठवा.

हे कसं करायचं?

Instagram वर WhatsApp updates साठी join करण्याचा message करा.

Website वर WhatsApp updates साठी number देण्यासाठी form द्या.

किंवा in-person customer ला विचारा—WhatsApp वर updates हवेत का? हवे असतील तर Yes type करा.

Rule 2: Value First, Promotion Later

80% messages हे valuable असले पाहिजेत.

म्हणजे:

  • Tips

  • Insights

  • Free Resources

आणि 20% messages हे Promotions, Offers आणि Product Launch यासारखे असू शकतात.

लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त promotional messages पाठवत राहिलात, तर लोक तुम्हाला block करतील.

Rule 3: Timing खूप Important आहे

Timing खूप इम्पॉर्टंट आहे.

सकाळी 9 ते 11 किंवा संध्याकाळी 6 ते 8 हे best timings आहेत.

रात्री 9:10 नंतर promotional messages करणं टाळा. लोकांना disturb करू नका.

Rule 4: Frequency Maintain करा

जर तुम्ही लोकांना रोज message केले, तर ते block करण्याचे chances वाढतात.

म्हणून promotional, tips आणि offer वाले messages maximum week मधून 2 ते 3 करू शकता.

Rule 5: Personal Tone ठेवा

लक्षात ठेवा, WhatsApp हे personal आणि conversational messaging app आहे.

त्यामुळे तुम्ही तिथे Email वाली language वापरली, तर ती लोकांना relate होणार नाही.

म्हणून नेहमी conversational content ठेवा.

उदाहरणार्थ:

“नमस्कार, आज एक quick tip आहे तुमच्यासाठी.”

हे better आहे.

त्याऐवजी:

“Dear Customer, Please find below our latest offer.”

अशी language WhatsApp वर वापरणं टाळा.


WhatsApp Automation म्हणजे काय?


WhatsApp Automation द्वारे automated customer messages manage करणारा भारतीय entrepreneur


आता बघूयात WhatsApp Automation म्हणजेच Chatbot कसा बनवायचा.

WhatsApp Marketing मधलं सगळ्यात powerful feature म्हणजे Automation. हे माझं सगळ्यात favourite आहे.

Chatbot म्हणजे काय?

Chatbot म्हणजे automated conversation जी तुमच्या customer सोबत तुम्ही available नसतानाही होते.

Chatbot चं एक Example

प्रिया नावाची एक मुलगी आहे. तिचा online साड्यांचा business आहे.

ती Instagram वर Ad देते:

“WhatsApp वर SAREE असा message करा.”

आता कोणी WhatsApp वर “SAREE” असा message केला, तर त्यांना automatically reply जातो.

Reply 1:
“नमस्कार, तुमचा Catalog येतोय.”

त्यानंतर saree च्या Catalog Images automatically पाठवल्या जातात.

Reply 2:
“कोणती साडी आवडली? किंवा dress आवडला? Size आणि Colors चे options पाहायचे आहेत का?”

Reply 3:
Customer ला पुढची माहिती दिली जाते.

Reply 4:
“तुमची Order confirm करायची असेल तर इथे click करा.”

हे सगळं automatically होतं.

यामध्ये प्रियाला काहीच करण्याची गरज नाही.


Chatbot साठी कोणती Tools आहेत?


WhatsApp Chatbot द्वारे customer queries आणि product catalog manage करणारा व्यवसाय मालक


Chatbot साठी काही tools वापरता येतात.

ManyChat: WhatsApp आणि Instagram Automation साठी सगळ्यात popular आहे.

WATI: WhatsApp Business API based असून India मध्ये खूप popular आहे.

AiSensy: Indian tool आहे, affordable आहे आणि चांगले features देखील आहेत.

Interakt: WhatsApp Business API साठी वापरता येतं.


Meta Ads आणि WhatsApp चं Combination


Meta Ads मधून WhatsApp वर customer leads मिळवणारा भारतीय digital marketer


आता एक Meta Ads आणि WhatsApp ची combination tip.

Meta Ads चे leads तुम्ही directly WhatsApp वर घेऊ शकता.

WhatsApp वर त्यांना convert करून घेतलं की त्यांच्यासोबत conversation करण्याचे आणि connected राहण्याचे chances जास्त वाढतात.

आणि इथून तुमचे conversions आणि business मिळायला सुरुवात होते.


WhatsApp Business ची Real Case Study


WhatsApp Marketing च्या मदतीने business results आणि customer orders तपासणारा व्यवसाय मालक


आता एक real case study सांगते, की WhatsApp Business effectively कसं वापरता येतं.

एक client होता. सातारा-based त्यांचा homemade लोणच्याचा business होता.

म्हणजेच साताऱ्यामधला एक homemade pickle brand.

Problem

Instagram वर भरपूर followers होते, पण orders येत नव्हत्या.

मग हे sort करण्यासाठी आम्ही एक strategy केली.

Step 1: WhatsApp Business Setup

WhatsApp Business App setup केलं.

Catalog add केला.

सगळ्या लोणच्यांची माहिती, photos आणि prices सगळं add केलं.

Step 2: Instagram वर Announcement

Instagram वर announce केलं:

“WhatsApp वर ‘लोणचे’ असा message करा आणि आमचा पूर्ण Catalog मिळवा.”

Step 3: Broadcast List

500 लोकांनी message केला.

त्यांना permission सोबत Broadcast List मध्ये add केलं.

Step 4: Weekly Broadcast

आठवड्याला एक Broadcast केला.

यामध्ये:

  • या आठवड्याचं Special

  • नवीन Flavour

  • Seasonal Offer

  • Customer Review

यांचा समावेश केला.

Step 5: Result

तीन महिन्यांनंतर orders तीन पट वाढल्या.

Monthly revenue जो आधी ₹10,000 ते ₹15,000 होता, तो directly ₹52,000 पर्यंत पोहोचला.

यातून शिकायची गोष्ट काय?

WhatsApp Marketing साठी मोठ्या budget ची गरज नाही.

WhatsApp Business App Free आहे.

त्याला जे लागतं, ती आहे फक्त Strategy आणि Consistency.


तुमच्यासाठी Action Plan

जर तुम्ही Business Owner असाल, तर आजच जर तुमचा WhatsApp Business proper setup केलेला नसेल, तर proper setup करा.

तुमचा Catalog create करा.

Quick Replies set करा.

Instagram वर देखील post करा की WhatsApp वर connect होण्यासाठी या QR ला scan करा किंवा WhatsApp वर inquiry साठी या number वर message करा.

याने तुमच्याकडे contacts वाढतील.

जर तुम्ही Student असाल

जर तुम्ही Student असाल, तर लक्षात ठेवा—तुम्ही जर Automation शिकलात आणि WhatsApp Business Setup करायला शिकलात, तर तुम्ही clients कडून per month ₹10,000 ते ₹15,000 फक्त setup चे charges घेऊ शकता.

जर तुम्ही Freelancer असाल

जर तुम्ही Freelancer असाल, तर तुम्ही हे skill चांगल्या प्रकारे sell करू शकता.

आजकाल Small असो, Medium असो किंवा Large Business असो, सगळ्यांनाच Automation ची गरज असते आणि proper setup ची गरज असते.

Freelancer Package मध्ये तुम्ही:

  • Catalog Setup

  • Broadcast Strategy

  • Monthly Management

याचं एक चांगलं package म्हणून sell करू शकता.


FAQ

WhatsApp Marketing म्हणजे काय?

WhatsApp Marketing म्हणजे customers सोबत connect करून WhatsApp वर तुमचा business grow करणं.

WhatsApp Marketing किती प्रकारे करता येतं?

Product आणि Service Promotion, Customer Support, Order Updates आणि Relationship Building अशा प्रकारे WhatsApp Marketing करता येतं.

WhatsApp Business म्हणजे काय?

WhatsApp Business हे Free मध्ये available आहे. यामध्ये Business Profile, Catalog, Quick Replies, Labels आणि Broadcast List यांसारखे features मिळतात.

WhatsApp Business मध्ये Broadcast किती chats ला करता येतो?

Maximum 256 chats पर्यंत Broadcast करता येतो. ज्यांनी तुमचा number save केला आहे, त्यांच्यापर्यंत message पोहोचतो.

WhatsApp Business API म्हणजे काय?

WhatsApp Business API हे businesses साठी design केलेलं official Meta product आहे. यामध्ये Bulk Messaging, Automation आणि CRM Integration करता येतं.

WhatsApp Broadcast करताना Permission का घ्यावी?

Random लोकांना WhatsApp messages पाठवू नयेत. ज्या लोकांनी WhatsApp updates किंवा messages साठी opt-in केलं आहे, त्यांनाच updates पाठवावेत.

WhatsApp Marketing साठी Best Timing कोणतं आहे?

सकाळी 9 ते 11 किंवा संध्याकाळी 6 ते 8 हे best timings आहेत.

WhatsApp Automation म्हणजे काय?

Chatbot म्हणजे automated conversation जी customer सोबत तुम्ही available नसतानाही होऊ शकते.


निष्कर्ष

आज आपण WhatsApp Marketing म्हणजे काय आणि Indian context मध्ये ते इतकं powerful का आहे हे शिकलो.

WhatsApp Marketing च्या माध्यमातून Product आणि Service Promotion, Customer Support, Order Updates आणि Relationship Building करता येतं.

WhatsApp Business हे Small Business साठी starting ला चांगलं आहे. Business scale झाल्यावर WhatsApp Business API कडे shift करता येतं.

WhatsApp Broadcast करताना Permission घेणं, Value First ठेवणं, योग्य Timing वापरणं, Frequency Maintain करणं आणि Personal Tone ठेवणं महत्त्वाचं आहे.

तसंच WhatsApp Automation आणि Chatbot च्या मदतीने customer सोबत automated conversation करता येते.

WhatsApp Marketing साठी मोठ्या budget ची गरज नाही. त्याला लागते ती Strategy आणि Consistency.

Post a Comment

0 Comments

Featured Post

अमेरिकेने AI ऐवजी SI म्हणजेच Super Intelligence  हे नाव  वापरण्याचा निर्णय का घेतला?