अलीकडच्या काळात एआयन ने जागतिक पातळीवर घेतलेल्या स्पीडची खूप जास्त चर्चा आहे. म्हणजे अगदी रजनीकांतच्या रोबोट सिनेमातला चिट्टी जसा हैदोस घालतो तसाच जुलै 2026 मध्ये एआयन कंपनीच्या 1000 एआय एजन्सी हगिंग फेस या एआय प्लॅटफॉर्मवर सायबर हल्ले केले आणि हे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय सगळं सुरू होतं अंथ्रोपेक आणि ओपन एआय सारख्या डव्हान्स कंपन्यांमधील संशोधक राजीनामे देतायत एआयचा स्पीड आणि प्रगती याच पद्धतीने चालत राहिली तर एक दिवस मानवजात संपुष्टात येईल अस या संशोधकांच म्हणण आहे.आता त्यांच हे भाकीत खरं होतं का हे येणारा काळच ठरवेल पण आता एआयचा आणखी एक कारनामा समोर आले आहे एआयन ने आता एक गणित सोडवलय तिरकस गुणाकार किंवा भागिले गुणिले एक्स वायझेड सारखं हे साधं गणित नाही हे गणित आहे 90 वर्ष जुनं गेली 90 वर्ष जगभरातले गणित तज्ञ संशोधक सगळ्यांनी हे गणित सोडवण्याचा प्रयत्न केला पण ते कोणालाच सुटलं नाही.
जगभरातल्या सात सर्वात अवघड असलेल्या गणितांपैकी हे एक गणित ज्याच उत्तर शोधण्यासाठी एक दशलक्ष डॉलर च बक्षीस ठेवण्यात आलय पण मोठमोठ्या तज्ञांना न सुटलेल हे गणित एआयन अवघ्या 88 तासात सोडवल्याचा दावा करण्यात आला एआय मधली आघाडीची कंपनी ओपन एआयन दावा केलाय की त्यांच्या एआय सिस्टीमन गणितातलं सगळ्यात कठीण मानलं जाणार नेवियर स्ट्रोक्स प्रॉब्लेम सोडवल आहे मात्र एआयच्या या दाव्यावर एका प्राध्यापकान आयडिया आणि डेटा चोरीचा आरोप केला आहे त्यामुळे एआयन सोडवलेल गणित आता वादाच्या भोवऱ्यात सापड आहे पण 90 वर्षांपासून न सुटलेलं नेवियर स्टोक्स इक्वेशन नेमकं काय आहे एआयन हे गणित कसं सोडवलं ओपन एआयच्या दाव्यानंतर गणित तज्ञांमध्ये कसली भीती आहे सविस्तर समजून घेऊयात.
आधी हे समजून घेऊयात की नेवियर स्टोक्स इक्वेशन नक्की आहे काय.
चहाचा कप हातात घेतला की दिसतं त्यातून निघणारा धूर थेट वर न जाता तो फिरत राहतो पसरतो कधी डावीकडे कधी उजवीकडे जातो नदीत पाणी वाहताना अचानक भौरा तयार होतो आकाशात वेगाने उडणार विमान असो की आपल्या शरीरात वाहणार रक्त असो द्रव आणि वायू अर्थात लिक्विड आणि गॅसेस कसे वाहतात त्यांचा वेग आणि दाब कसा बदलतो हे सांगणारे जे गणितीय नियम आहेत त्याला गणिताच्या भाषेत नेवियर स्ट्रोक्स इक्वेशन म्हटलं गेलं.
19 साव्या शतकात फ्रान्सचे शास्त्रज्ञ क्लॉड लुई नेवियर आणि आयरलंडचे जॉर्ज गॅब्रियल स्टोक्स यांनी वेगवेगळ्या वेळी हे समीकरण विकसित केलं म्हणून ह्याला नेवियर स्ट्रोक्स असं नाव पडलं आज हवामानाचा अंदाज वर्तवण असो विमानासह किंवा गाड्यांच एरोडायनामिक डिझाईन करण असो अथवा बायोमेडिकल क्षेत्रात ब्लड सर्कुलेशन समजून घेणे असो या समीकरणाचा वापर जगभरात केला जातो पण मग प्रश्न पडतो की जर हे इक्वेशन अगोदरच वापरत आहे तर याला सोडवायचं कशाला यात अडचण काय तर आपण हे इक्वेशन व्यवहारात वापरतो हे खर आहे पण हे इक्वेशन जगातील प्रत्येक कठीण आणि कोणत्याही भौगोलिक परिस्थितीत नेहमीच अचूक काम करेल का हे गणितीय दृष्ट्या सिद्ध झालेल नाही थोडक्यात या इक्वेशनचा मुख्य उद्देश हा होता की जर पाणी किंवा हवा यासारख्या एखाद्या त्रिमितीय द्रवाचा प्रवाह सुरुवातीला एकदम शांत असेल तर भौतिक शास्त्राच्या नियमानुसार पुढे जाऊन तो कधीतरी इतका अनियंत्रित होऊ शकतो का जेणेकरून त्याचा वेग इनफायनाईट होईल गणिताच्या भाषेत इनफायनाईट वेगाच्या स्थितीला सिंगुलरिटी म्हणतात जर समीकरणात अशी सिंगुलरिटी तयार झाली तर हे समीकरण अपयशी ठरतं अगदी हेच 90 वर्षांपासून जगातील एकाही माणसाला गणितीय दृष्ट्या सिद्ध करता आलेल नाही सन 2000 मध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध क्ले मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूटन जगभरातील गणितातील सर्वात कठीण अशा सात प्रॉब्लेमची निवड केली या प्रॉब्लेम्सला मिलेनियम प्राईज प्रॉब्लेम्स असं नाव देण्यात आलं संस्थेने जाहीर केलं की या सात पैकी जे कोणतही गणित जो कोणी पहिल्यांदा सोडवेल त्याला एक दशलक्ष डॉलर म्हणजेच साधारण साडे कोटी रुपयांच बक्षीस दिलं जाईल गेल्या 26 वर्षात या सात पैकी फक्त एक प्रॉब्लेम एका रशियन गणिती तज्ञान सोडवलं होतं.
उर्वरित सहा प्रॉब्लेम कोणालाही सुटत नव्हती ज्यामध्ये नेवियर स्टोक्स हे सर्वात महत्त्वाचं आणि जुनं कोड होतं पण 8 सप्टेंबरला जगातील सगळ्यात मोठी एआय कंपनी ओपन अचानक एक घोषणा केली. त्यांनी सांगितलं की त्यांच्या एका एआय इंटर्नल नेक्स्ट जनरेशन मॉडेलन नेवियर स्ट्रोक्स प्रॉब्लेमच उत्तर शोधून काढला आहे आणि तेही फक्त 88 तासात ओपन एआय कंपनीच्या मते त्यांच्या एआयन हे सिद्ध केलं की एका विशिष्ट चक्राकार भोऱ्यामध्ये लिक्विडचा वेग इतका प्रचंड वाढतो की तिथे सिंगुलरिटी म्हणजेच गणितीय ब्रेकडाऊन निर्माण होतं आणि हे समीकरण कोलमडून पडतं म्हणजेच हे समीकरण एका विशिष्ट मर्यादेनंतर अपयशी ठरतं विशेष म्हणजे ओपन एआयन स्पष्ट केलं की आम्ही हे काम फक्त विज्ञानाच्या प्रगतीसाठी केलय आणि आम्ही त्या नऊ कोटी रुपयांच्या बक्षिसावर कोणताही दावा करणार नाही पण जे काम माणसाला 90 वर्ष जमलं नाही ते एआयन अवघ्या 88 तासात कसं केलं.
तर एआयन उत्तर शोधण्यासाठी एका चक्राकार फिरणाऱ्या भोवऱ्याच गणितीय मॉडेल तयार केलं हा पाण्याचा किंवा हवेचा भोरा आतल्या बाजूला आवळत जातो आणि एखाद्या स्पॅगेटी नुडल सारखा लांबट होत जातो जस जस जसा हा मध्यभाग लहान होतो तस तसा त्याचा फिरण्याचा वेग इतका वाढतो की एका विशिष्ट सेकंदात तो इन्फायनाईट होतो विशेष म्हणजे यासाठी बाहेरून कोणतीही मोठी ताकद लावावी लागत नाही लिक्विडच्या स्वतःच्या अंतर्गत गतीमुळेच ही स्थिती निर्माण होते या उत्तरामुळे मिलेनियम प्रॉब्लेमच्या नियमांमधील विधान सी आणि डी सिद्ध झालं हे उत्तर शोधण्यासाठी ओपन एआयन द हज एजंटचा वापर केला त्यांनी द हज एआय एजंटचे वेगवेगळे गट तयार केले काही गटांना हे समीकरण नेहमी योग्य उत्तर देतं हे सिद्ध करण्याचं काम दिलं तर काही गटांना हे समीकरण अपयशी कसं ठरतं हे सिद्ध करायला सांगितलं प्रत्येक गटान गणित सोडवण्यासाठी वेगवेगळ्या जुन्या आणि नव्या सिद्धांतांचा अभ्यास केला जेव्हा एखाद्या गटाला गणितात काही नवीन आयडिया सापडायची तेव्हा कोडेक्स सिस्टीम द्वारे ती माहिती इतर गटांना दिली जायची एजंट्सनी आपापसात तब्बल 27 लाख मेसेजेस पाठवून एकमेकांना मदत केली.
या 10,000 एआय एजंट्सनी सतत 88 तास गणितीय आकडेमोड केली आणि शेवटी शनिवार 5 सप्टेंबरला अचूक उत्तर शोधल्याचा दावा उपन्यायान केला. यान उत्तर शोधलं असलं तरी ते गणिताच्या नियमात बसत का हे पाहणं गरजेचं होतं. मानवी गणित तज्ञांना 165 पानांच हे उत्तर तपासण्यासाठी अनेक महिने लागले असते त्यामुळे उपनयान लीन नावाच्या एका प्रोग्रामिंग लँंग्वेजचा वापर केला. दुसऱ्या एका एआय मॉडेलन पुढील 17 तासात या 165 पानांच्या पुराव्यातील प्रत्येक ओळ प्रत्येक समीकरण आणि प्रत्येक तर्क योग्य आहे की नाही याच कॉम्प्युटर व्हेरिफिकेशन केलं लीन सॉफ्टवेअरन या उत्तराला हिरवा कंदील दाखवला म्हणजेच या गणितात कोणतीही चूक नाही हे सिद्ध झालं.
ओपन एआय ची ही घोषणा ऐकून संपूर्ण जगाने कौतुक करायला हवं होतं पण तसं घडलं नाही ही घोषणा झाल्याच्या अवघ्या काही तासांतच ओपन एआयच्या दाव्यावर आक्षेप घेण्यात आला न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे गणिताचे प्राध्यापक ट्रिस्टन बकमस्टर आणि अंथ्रोपेक या कंपनीतील गणितज्ञ लेवेंट अल्पोगे यांनी ओपनवर गंभीर आरोप केले प्रोफेसर बकमस्टर आणि अल्पोगे गेल्या वर्षभरापासून याच इक्वेशनवर काम करत होते हे संशोधन करताना ते त्यांच्या कोडिंग आणि गणिताच्या मसूद्यासाठी ओपन एआयच्या कोडेक्स या टूलचा वापर करत होते ऑगस्ट महिन्यात त्यांनी या इक्वेशनच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन विजय मिळवला होता त्यांनी असा आरोप केला की की त्यांचा हा अनपब्लिश डेटा ओपन एआयच्या सर्वरवर सेव होता. बक मास्टर यांच्या मते ओपन एआयला जेव्हा कळलं की दोन संशोधक हे गणित सोडवण्याच्या अगदी जवळ आलेत तेव्हा ओपन एआयन त्यांचा डेटा चोरी करून आपले द हज एआय एजंट्स कामाला लावले आणि स्वतःच क्रेडिट घेतलं बक मास्टर यांनी असाही आरोप केलाय की ओपन एआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना धमकावण्याचा आणि त्यांचा श्रेय हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.
आता ओपन एआयचे संशोधक सेबेस्टियन बुबेक यांनी डेटा आणि आयडियाची चोरी केल्याचा आरोप फेटावून लावलाय पण ओपन एआयच्या युजर डेटाचा वापर एआय मॉडेल ट्रेन करण्यासाठी झाल्याची शक्यता ओपन एआयने सुद्धा आपल्या स्टेटमेंट मध्ये नाकारलेली नाही या संपूर्ण वादावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत जगात गणिताच नोबेल मानलं जाणारं फिल्ड्स मेडल विजेते गणितज्ञ टेररन ताव यांनी इशारा दिला की जर एआय कंपन्या अशाप्रकारे मानवी गणित तज्ञांचा अनपब्लिश डेटा आणि आयडिया चोरून समस्या सोडवू लागल्या तर भविष्यात कोणतेही संशोधक आपल्या नवीन आयडिया उघडपणे मांडणार नाही हे विज्ञानाच्या आणि गणिताच्या विकासासाठी अतिशय घातक आहे क्ले मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूटन यावर आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की एआयन दिलेल उत्तर अजून पिअर रिवू झालेल नाही.
जगातील ज्येष्ठ गणितज्ञ या 165 पानांच्या पुराव्याची सखोल तपासणी करतील आणि त्यानंतरच या दाव्यावर शिक्का मुर्तब होईल आता समजा जर हा पुरावा खरा ठरला तर भविष्यात हवामानाचे अचूक अंदाज वर्तवणं विमानांची सुरक्षितता वाढवणं आणि ब्लड सर्क्युलेशन संबंधित आजारांवर संशोधन करणं एआयच्या मदतीने अधिक सोपं होईल असं सांगितलं जातय एकंदरीतच एकीकडे एआयन फक्त 88 तासात 90 वर्ष जुन गणित सोडवल्याचा दावा आहे तर दुसरीकडे क्रेडिट आणि डेटा चोरीच्या वादामुळे एआयच्या नैतिकतेवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.

0 Comments