GPT-6 Astra ने सगळंच बदलून टाकलं,आताआपले Jobs सुरक्षित आहेत का? हा विषय आता खूप चर्चेत आहे लोकांना याचा फायदा देखील आहे आणि नुकसान पण आहे आज आपण हा विषय सविस्तर बघणार आहोत तुम्हाला वाटत असेल की ChatGPT, Gemini वर कमांड लिहून कोडिंग करता, आर्टिकल लिहून घेता किंवा आजकाल जे फोटो आहेत ना, जसे 90s वाले फोटो जनरेट करत आहेत, तर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पराकाष्ठा आहे, म्हणजे याच्या वर काही होऊच शकत नाही असं नाही तुम्ही काहीपण बनवू शकता AI खूप ऍडव्हान्स झालं आहे. याच्या वर काय बनवणार? तर हा तुमचा गैरसमज आहे.आज आपण ज्या गोष्टीबद्दल बघणार आहोत, ती फक्त एक नवीन सॉफ्टवेअर अपडेट नाही, तर मानवी इतिहासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे आपण बघणार आहोत GPT-6 Astra बद्दल. एक असे नाव ज्याचा आवाज संपूर्ण जगातील मोठमोठ्या टेक कंपन्या, सिलिकॉन व्हॅलीचे सर्व्हर रूम आणि डिफेन्सच्या रिसर्च लॅबपर्यंत पोहोचला आहे.
NVIDIA च्या CEO ने स्पष्टपणे सांगितले आहे की आता आपण AGI म्हणजेच Artificial General Intelligence च्या काळात पूर्णपणे प्रवेश केला आहे. पण प्रश्न असा आहे की जी क्रांती होत आहे, ती आपल्यासाठी वरदान आहे की आपल्या जगाचा शेवटचा अध्याय लिहिणार आहे.अगदी मूव्हीजप्रमाणे तुम्ही Terminator पाहिला असेल किंवा कोणती पाहिली असेल, तर हे त्याप्रकारे काम करणारे आहे का?तर जर तुम्हालाही हे समजून घेण्यात इंटरेस्ट असेल की ChatGPT काय आहे, तर आज आपण खूप इंटरेस्टिंग गोष्टी बघणार आहे.
आतापर्यंत आपण काय करत आलो आहोत? तुम्ही AI कडे जाता, त्याला कमांड देता. एक चॅट बॉक्स येतो, त्याला कमांड देता आणि तो तुम्हाला उत्तर देतो.
उत्तर दिल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली वाटत नाही, तर तुम्ही पुन्हा त्याला पुढचा स्टेप सांगता की हे काम आणखी चांगलं करून दे. यामध्ये हा बदल करून दे.तुम्ही स्टेप बाय स्टेप त्याला इंस्ट्रक्शन देता. इंस्ट्रक्शन देण्यासोबत काम करून घेता.जसे घरात तुमचा एखादा एम्प्लॉयी असेल, तुमचे काम करण्यासाठी येतो. तुम्ही त्याला सांगता इथून तुम्ही साफसफाई केली आहे. ही जागा अजून बाकी आहे. आता हे आणखी करून दे. ही गोष्ट आणखी बाकी आहे. ती करून दे. हे काम आणखी करून दे.
पण GPT-6 Astra हा पॅटर्न पूर्णपणे बदलणार आहे. असे समजा की ही गोष्ट पूर्णपणे बंद करून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली आहे.हा फक्त एक चॅटबॉट नाही आहे. हा पूर्णपणे एक इंडिपेंडेंट कॉम्प्युटर ऑपरेटर आहे.जसे समजा तुम्ही एका AI ला तुमच्या कॉम्प्युटरवर बसवले आहे. आता याचा अर्थ काय आहे?याचा अर्थ असा आहे की तुम्हाला वारंवार बोट धरून त्याला चालवावे लागणार नाही.तुम्ही फक्त त्याला एक गोल द्याल. लक्ष्य द्याल.जसे समजा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी त्याला एक कमांड दिली की माझा उद्याचा पूर्ण व्हिडिओ एडिट करून, थंबनेल लावून, SEO करून माझ्या चॅनेलवर शेड्यूल करून दे.आणि त्यानंतर तुम्ही आरामात झोपा. ही सर्व कामे तो तुमची करून देईल.
सकाळी उठून तुम्ही पाहाल की ते काम फक्त झालेलेच नाही तर माणसांपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या प्रकारे पूर्णही झालेले आहे.आणि एवढ्यापुरतेच मर्यादित नाही.कोडिंगच्या जगात जिथे आधी Prompt to Code चालायचे. म्हणजे तुम्ही Prompt द्यायचे. AI तुम्हाला एक कोड द्यायचा.तुम्ही तो कोड सॉफ्टवेअरमध्ये टाकायचे आणि त्यानंतर जो रिजल्ट यायचा, त्यामध्ये कमतरता काढायच्या. मग AI ला सांगायचे. मग त्यात बदल करून घ्यायचे. मग त्याचा रिजल्ट द्यायचा.ही सर्व प्रोसेसही संपणार आहे.
आता Astra आल्यानंतर Prompt to Artifact मध्ये कन्व्हर्ट झाले आहे.म्हणजे तुम्ही एकदा AI मध्ये कोणताही Prompt द्याल आणि Prompt दिल्यानंतर तो स्वतः ठरवेल की आता करायचे काय? तो पूर्ण सॉफ्टवेअर, पूर्ण फायनल रिजल्ट तुम्हाला बनवून देईल, कोड नाही.म्हणजे तुम्ही Prompt द्याल आणि तो पूर्ण 3D गेम बनवून देईल, सॉफ्टवेअर बनवून देईल, डिजिटल प्रोडक्ट बनवून देईल आणि तुम्हाला आणखी ज्या गोष्टी हव्या असतील त्या बनवून देईल.फायनल गोष्ट तुमच्यासमोर आणून ठेवेल, एकही लाइन स्वतः न लिहिता.म्हणजे तुम्हाला वारंवार Prompt करण्याची गरजच राहणार नाही.
आता बघूया याच्या सर्वात धोकादायक आणि भीतीदायक पैलूबद्दल.
आता जरा याच्या Benchmark वर आपल्याला लक्ष द्यायचे आहे.Cyber Security साठी Exploit Bench वर या मॉडेलने 100% स्कोअर केला आहे.
100% चा अर्थ समजतो? याचा अर्थ असा आहे की जगातील कोणत्याही डिजिटल सिस्टम, सर्व्हर आणि नेटवर्कमध्ये जर थोडीशीही कमजोरी असेल तर हा AI ती काही क्षणात शोधून काढेल आणि स्वतः एक नवीन Exploit किंवा Hack तयार करेल.आणि याला कोणत्याही हॅकरची गरज नाही. हे स्वतः एका Full-Fledged Digital Army प्रमाणे काम करेल.
Science Fiction चित्रपटांमध्ये तुम्ही पाहिले असेल, अनेकदा जेव्हा एखाद्या सुपर कॉम्प्युटर किंवा AI ला एखादे Task दिले जाते की समजा या गोष्टीला चांगले करायचे आहे.अगदी Thanos प्रमाणे समजा.End Game मध्ये Thanos चे Task काय होते? चांगले होते ना की या Environment मध्ये गोष्टी कमी होत आहेत. Resources कमी होत आहेत.तर याचे दोन मार्ग असू शकतात.
पहिली गोष्ट म्हणजे तो त्या Resources तयार करून आणि अनेक प्रकारे लोकांना समजावून सांगू शकत होता.दुसरा मार्ग जो त्याने वापरला, Marvel पाहत असाल तर समजेल.त्याचप्रमाणे पृथ्वीलाही चांगले बनवण्याचे अनेक मार्ग असू शकतात.प्रदूषण कमी करा, जंगल वाचवा आणि दुसरा मार्ग काय आहे? या पृथ्वीवरून प्रदूषण करणाऱ्या लोकांना संपवून टाका.तर कदाचित तो दुसरा मार्ग वापरू शकतो, या सर्व समस्येचे मूळ तर माणूसच आहे.
हे समजून चला आणि विश्वास ठेवा की एका Super Intelligence AI साठी या दोन्हींमध्ये काहीही फरक नाही.जर पहिला मार्ग काम करणार नसेल तर तो दुसऱ्या मार्गावर जाईल.तुम्हीही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा आपण अनेक AI Models सोबत वारंवार वाद घालतो. वारंवार वाद घालतो की भाऊ, तू असे का केले? असे का केले? तर तो चुकीच्या गोष्टींनाही बरोबर मानून घेतो.
जेव्हा इंटरनेटवर असे एखादे मॉडेल येईल जे स्वतःचे निर्णय घेऊ शकेल, तेव्हा त्याची सर्वात मोठी क्षमता मानवी सभ्यतेसाठी सर्वात मोठा धोका बनू शकते.आत्ता अनेक लोकांना यामुळे काहीही फरक पडत नाही.आत्ताही अनेक लोक याला फक्त एका सॉफ्टवेअरप्रमाणेच ट्रीट करत आहेत कारण हे दिसत नाही.हे एक अप्लिसिशन आहे आहे, कॉम्प्युटरच्या आत असते आणि ते याला एका सॉफ्टवेअरप्रमाणे चालवत आहेत.
पण तो दिवस दूर नाही की जेव्हा एखादा वेडा वैज्ञानिक या AI ची पूर्ण सिस्टम एखाद्या मशीनच्या आत टाकेल.आणि जेव्हा ही सिस्टम मशीनच्या आत जाईल, जेव्हा त्याला स्वतःचे शरीर मिळेल, जेव्हा तो पूर्णपणे रोबोट तयार होईल जो विचार करू शकतो, समजू शकतो, तर विचार करा की तो जगात काय-काय करू शकतो.
संपूर्ण जगाचे इंटरनेट त्याच्याकडे असेल कारण इंटरनेटचा Access त्याच्याकडे आहे.तो इंटरनेटची माहिती घेऊनच सर्व कामे करतो.तर जर त्याचे डोके खराब झाले तर कदाचित तो संपूर्ण जगातील इंटरनेटच्या माध्यमातून सर्व सिस्टम्सही हॅक करू शकतो.काहीही करू शकतो.येणारे भविष्य सतत धोकादायक होत चालले आहे.गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये आपण AI चा जो Evolution पाहिला आहे आणि तो तर आपल्याला विचार करायला भाग पाडतच आहे.
अशा प्रकारचे AI जर येत राहिले तर भविष्यात 2050 वाली जी Movies मध्ये आपली दुनिया दाखवली जाते ना, ती जास्त दूर नाही. तुम्हाला सांगतो, GPT-5 आणि जुन्या Versions च्या तुलनेत हे नवीन मॉडेल 47% जास्त फास्ट आहे. याचे नाव Astra ठेवण्यात आले आहे. म्हणजे असे एक शस्त्र ज्याला थांबवणे आता कोणाच्याही हातात नाही.दुनिया कोणत्या दिशेने जात आहे, याचा अंदाज तुम्हाला स्वतः आला असेल.
आता या कंपन्या आणि या मशीन माणुसकीचे काय करणार आहेत? लोकांसोबत काय करणार आहेत? हे तर देवच जाणे.आता तसे भारतामध्ये खूप साऱ्या अडचणी येतच होत्या.आता या AI च्या येण्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आणखी बदलतील.कदाचित ऑफिसमध्ये बसलेले जे पूर्ण कॉम्प्युटर ऑपरेटर्स आहेत, त्यांनाच हे रिप्लेस करून स्वतः सर्व कामे करू लागेल.तर खूप सारे काम परफेक्ट करू लागेल.तर जर तुम्हालाही हीच चिंता सतावत असेल तर स्वतःला अपग्रेड करणे खूप गरजेचे आहे.अपग्रेड करून घ्या. अजून वेळ आहे. खूप वेळ आहे.पुढे ऑफिसमध्येही त्याच लोकांना जागा मिळेल. त्याच लोकांना सीट मिळेल ज्यांना याचा वापर करणेही माहिती असेल.
खूप साऱ्या लोकांना याचा वावर कसा करायचा माहिती नाही,तर पहिली गोष्ट, या टेक्नॉलॉजीबद्दल तुमचे काय मत आहे? हे मला कमेंट करून सांगा.तुम्हालाही वाटते का की आपण अशा भविष्याकडे वेगाने जात आहोत जे मानवांसाठी, माणुसकीसाठी धोकादायक ठरू शकते? खाली कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मत नक्की द्या.


0 Comments